Pimpri News: महापालिका पाणीपुरवठा विभागाचे सहशहर अभियंता प्रवीण लडकत सेवानिवृत्त

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे सहशहर अभियंता प्रवीण लडकत सेवानिवृत्त झाले. महापौर उषा ढोरे यांच्याहस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने माहे फेब्रुवारी 2022 अखेर सेवानिवृत्त व स्वेच्छानिवृत्त होणा-या कर्मचा-यांचा सत्कार महापौर ढोरे यांच्या हस्ते करण्यात आला. नगरसेवक केशव घोळवे, उपआयुक्त चंद्रकांत इंदलकर, कामगार कल्याण अधिकारी प्रमोद जगताप, जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक तसेच सेवानिवृत्त कर्मचा-यांचे नातेवाईक उपस्थित होते.

माहे फेब्रुवारी 2022 मध्ये नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होणा-या कर्मचा-यांमध्ये सहशहर अभियंता प्रवीण लडकत, मुख्याध्यापक संध्या गवळी, अनिता बगाटे, मंगल काळे, उपअभियंता स्थापत्य भाऊसाहेब साबळे, सहाय्यक शिक्षक पंढरीनाथ जरांडे, क्रीडा शिक्षक देवेंद्र घोडके, गटनिर्देशक सुनील मोरे, उपशिक्षक माधुरी जाधव, छाया गायकवाड, वाहनचालक बस्सीर तांबोळी, रखवालदार अंकुश पवार, मजूर दीपक गागडे, सफाई सेवक कमलेश ककरोठी, गटरकुली प्रकाश कांबळे यांचा समावेश आहे. तर स्वेच्छानिवृत्त घेतलेल्या कर्मचा-या॑मध्ये कार्यालयीन अधिक्षक साहेबराव साळुंके, मुकादम रविंद्र गायकवाड, शिपाई अजित शितोळे, स्प्रे कुली लक्ष्मण राऊत, सफाई कामगार मिलिंद गायकवाड, सफाई सेवक गोपाल घारू, कचरा कुली सुरेश जगताप यांचा समावेश आहे.

महापौर माई ढोरे म्हणाल्या, सेवानिवृत्ती हा प्रत्येक कर्मचा-र्याच्या आयुष्यातील महत्वाचा टप्पा असून सेवानिवृत्तीनंतरचा तुमच्या जीवनातील प्रत्येक दिवस आनंददायक आणि आरोग्यदायी जावो अशा शब्दात भावना व्यक्त करून महापौर उषा ढोरे यांनी सेवानिवृत्तांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.

 

सेवानिवृत्त अधिकारी,कर्मचा-यांची कार्यपद्धती आणि कामाविषयीची निष्ठा प्रशंसनीय आहे. त्यांचा अनुभव महानगरपालिकेतील कार्यरत कर्मचा-यांना मार्गदर्शक ठरेल असेही त्या म्हणाल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रफुल्ल पुराणिक यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.