Pimpri News : रहीम इलेव्हन संघाने पटकावला पिंपरी इलेव्हन करंडक

एमपीसी न्यूज – पिंपरी येथील संदीप बाळकृष्ण वाघेरे युवा मंचच्या (Pimpri News) वतीने आयोजित पिंपरी करंडक 2022-23 च्या तिसऱ्या पर्वाचा करंडक पुण्यातील रहीम इलेव्हन संघाने पटकावला. या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ विविध मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला.

मावळचे खासदार श्रीरंग बारणे, पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे, विधानपरिषदेच्या आमदार उमा खापरे, माजी नगरसेवक नाना काटे, संदीप वाघेरे, शत्रुघ्न काटे, हर्षल ढोरे, शितल शिंदे, कैलास बारणे, कुणाल लांडगे, चंद्रकांत नखाते, मोरेश्वर शेडगे, संतोष कुदळे, सामजिक कार्यकर्ते देवदत्त लांडे, गणेश ढाकणे, कैलास सानप, संजय गायखे आदी मान्यवरांच्या हस्ते विजेत्या संघाना बक्षिसे तर स्पर्धकांना देखील उत्तेजनार्थ ट्रॉफीचे वाटप करण्यात आले.

या स्पर्धेत एकूण 88 संघांनी सहभाग नोंदवला. रहीम इलेव्हन संघ पुणे यांनी दमदार कामगिरी करीत स्पर्धेचे कै.सौ.सुमन बाळकृष्ण वाघेरे यांच्या स्मरणार्थ 1,12,000/- रुपये व चषक असलेले प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले. तर, कै.सौ.सविता सुभाष वाघेरे यांचे स्मरणार्थ द्वितीय क्रमांकाचे 71,000/- रुपयांचे पारितोषिक आणि चषक देहूरोड क्रिकेट संघ देहूरोड, तृतीय क्रमांकासाठी कै.श्री.दत्तोबा हरिभाऊशेठ वाघेरे यांच्या स्मरणार्थ 31,000/- रुपयांचे पारितोषिक आणि चषक झुंजार क्रिकेट संघ पिंपरी, कै.श्रीमती रंगुबाई निवृत्ती कुदळे यांच्या स्मरणार्थ चतुर्थ क्रमांकासाठी 21,000/- रुपयांचे पारितोषिक आणि चषक नगरसेवक राजेंद्र जगताप स्पोर्ट फौंडेशन तसेच 40 वर्षावरील खेळाडूंसाठी ( 40 प्लस ) कै. श्री योगेश पोपटराव वाघेरे यांच्या स्मरणार्थ प्रथम क्रमांकासाठी 35,000/- रुपयांचे पारितोषिक आणि चषक रहीम इलेव्हन संघ देहूरोड व कै.श्री.राजेश शंकर गायकवाड यांच्या स्मरणार्थ द्वितीय क्रमांकासाठी 25,000/- रुपयांचे पारितोषिक व चषक पिंपरी इलेव्हन संघ पिंपरी यांना देण्यात आले.

Vinaya Tapkir : कोरोना काळातही विनया तापकीर यांची चऱ्होलीकरांना खंबीर साथ – भाग दोन

तसेच सालाबादप्रमाणे संदीप वाघेरे यांच्या 2023 वर्षीच्या (Pimpri News) दिनदर्शिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. संदीप वाघेरे यांच्या सुमारे 20000 प्रतींचे वाटप पिंपरीगाव व परिसरामध्ये करण्यात येणार असल्याची माहिती वाघेरे यांनी दिली. माजी नगरसेवक संदीप वाघेरे यांच्या वतीने 25 डिसेंबर ते 1 जानेवारी दरम्यान या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेचे नियोजन राजेंद्र वाघेरे, संदीप नाणेकर, सचिन वाघेरे, युवा मंचाचे अध्यक्ष हरिष वाघेरे, रोहित लाळगे, किरण वाघेरे, राहुल वाघेरे, अभिजित चव्हाण यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.