Pimpri News: महिला व बालकल्याण समिती सभापतींसह सात सदस्य ‘गुपचूप’ केरळ दौऱ्यावर

कोरोनाच्या पार्श्वभूमीवरही दौरा सुरु

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील ( Pimpri chinchwad Municipal Corporation)  महिला व बाल कल्याण समितीच्या सभापतींसह  ( child welfare committee chairpersons)  सात सदस्य गुपचूप केरळ दौ-यावर ( secret Tour Of Keral) गेले आहेत. विशेष म्हणजे दौ-यात महापालिकेचा एकही अधिकारी गेला नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या सदस्यांनी केरळ दौ-यावर जाऊन मोठी रिस्क घेतली आहे. या दौ-यामुळे भाजपच्या ( Bjp) धोरणालाही हरताळ फासला गेला आहे.

महिला व बालकल्याण समितीच्या सभापती चंदा लोखंडे, भाजपच्या माधवी राजापुरे, सविता खुळे, योगिता नागरगोजे, निर्मला गायकवाड आणि राष्ट्रवादीच्या गीता मंचरकर, निकीता कदम असे सात सदस्य केरळच्या अभ्यास दौ-यावर गेले आहेत. तर, राष्ट्रवादीच्या मंगला कदम, शिवसेनेच्या अश्विनी चिंचवडे यांनी दौ-यावर जाणे टाळले आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवरही महिला व बालकल्याण समितीच्या सभापती लोखंडे या सात सदस्यांसह केरळ दौ-यावर गेल्या आहेत. त्यांनी 26 जानेवारी रोजी केरळच्या दिशेने ‘टेक ऑफ’ केले. 30 जानेवारीपर्यंत हा दौरा असणार आहे. महिला बचतगटांची माहिती घेण्यासाठी हा दौरा असल्याचे सांगितले गेले. कोणत्याही अभ्यास दौ-यात प्रशासकीय अधिकारी सोबत असतात. पण, या दौ-यात एकही महापालिकेचा अधिकारी गेला नाही.

महापालिका इतिहासात पहिल्यांदाच केवळ सदस्यच दौ-यावर गेले आहेत. या दौ-यात कशाची माहिती घेतली जाणार याचा कोणताही कार्यक्रम दिलेला नाही. दौरा कसा असेल, याचीही माहिती नाही. शिवाय हा दौरा देखील गुपचूप काढण्यात आला आहे. दौ-यावरील खर्चाचीही माहिती देण्यात आलेली नाही. तसेच भाजपने सत्तेत येताच दौ-याच्या नावाखाली करदात्यांच्या पैशांची उधळपट्टी केली जाणार नसल्याचे सांगितले होते. या दौ-यामुळे पक्षाच्या भुमिकेलाही हरताळ फासला गेला आहे.

महिला व बालकल्याण समिती सभापतींसह सात सदस्य केरळ दौ-यावर गेले आहेत. त्यांच्यासोबत प्रशासकीय अधिकारी गेला नसल्याचे नागरवस्ती विभागाचे उपायुक्त अजय चारटणकर यांनी सांगितले.

तर, दौ-याबाबत आपल्याला काही माहिती नाही. माहिती घेतली जाईल, असे सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.