Pimpri News : सोसायटीच्या कंपाउंडची भिंत पडली; एकजण गंभीर जखमी

एमपीसी न्यूज – सोसायटीच्या कंपाउंडची भिंत पडल्याने त्याखाली अडकून एक व्यक्ती गंभीर जखमी झाला. ही घटना शुक्रवारी (दि. 27) दुपारी सव्वादोन वाजताच्या सुमारास पिंपरी गाव येथे घडली.

राजू जयराम गायकवाड (वय अंदाजे 45, रा. पिंपरी गाव) असे गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. नगरसेवक संजोग वाघेरे यांनी याबाबत अग्निशमन विभागाला माहिती दिली.

अग्निशमन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, दुपारी सव्वादोन वाजताच्या सुमारास भैरवनाथ नगर, पिंपरीगाव येथील साई सोसायटीची भिंत कोसळली. त्याखाली एकजण अडकला असल्याची माहिती नगरसेवक संजोग वाघेरे यांनी दिली. त्यानुसार मुख्य केंद्र आणि रहाटणी उपकेंद्र असे दोन बंब घटनास्थळी दाखल झाले.

सब ऑफिसर ऋषिकांत चिपाडे, सूर्यकांत मठपती, गौतम इंगवले, वाहन चालक संभाजी दराडे, बाळासाहेब वैद्य, अक्षय शिर्के, अंकुश परब, दिग्विजय नलावडे, सिद्धेश दरवेश, सोनाली साबळे, वाहन चालक विशाल बाणेकर, विष्णू बुधवंत, अनिल वाघ, ओंकार रसाळ, अर्जुन वाघमारे यांनी कोसळलेल्या भीतीमध्ये अडकलेल्या राजू गायकवाड यांना बाहेर काढले. मात्र ते गंभीर जखमी झाले होते. त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. भिंत कोसळण्याचे नेमके कारण समजू शकले नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.