Pune News : सुतिका सेवा मंदिर कामगारांना सहा हजार वेतन वाढीचा करार संमत 

एमपीसी न्यूज – सुतिका सेवा मंदिर (गोडबोले हॉस्पिटल) मधील कामगारांना सहा हजार रूपये वेतन वाढ देण्याचा करार संमत झाला आहे. या कराराअंतर्गत नर्सेस व चर्तुथ श्रेणी कामगारांना प्रतिमाह सहा हजार रूपये वेतन वाढ मिळणार आहे. भारतीय मजदूर संघाने वेतन वाढीच्या मागणीचा पाठपुरावा केला. त्याला यश आले आहे. हा करार 1 जानेवारी 2021 पासून 3 वर्षांसाठी असेल.

करारावर सुतिका सेवा मंदिर (गोडबोले हॉस्पिटल) या व्यवस्थापनाच्या वतीने मुख्य कार्यकारी विश्वस्त डॉ. दिलीप देवधर, डॉ. अलोक देवधर, विश्वस्त डॉ. राम धोंगडे, प्रदीप आठवले तर, भारतीय मजदूर संघाच्या वतीने संघटनेचे चिटणीस बाळासाहेब भुजबळ, कामगार प्रतिनिधी सुजाता वाळुंज, गणेश जाबरे यांनी वेतन वाढीच्या करारावर सह्या केल्या. या वेळी महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाचे सरचिटणीस सचिन मेंगाळे उपस्थित होते.

 
वेतन वाढ करारातील तरतुदी

– हॉस्पिटल उद्योगाला लागु असलेला बदलता महागाई भत्ता मिळणार.

– कामगारांची तीन लाखांची मेडिकल पॉलिसी हॉस्पिटलच्या वतीने काढली जाणार.

– हॉस्पिटलमधील उपलब्ध वैद्यकीय सुविधा कामगारांना मोफत दिल्या जाणार.

– कामगाराची सून व मुलगी यांची प्रथम प्रसूती हॉस्पिटलच्या वतीने मोफत.

– दिवाळीला एक महिन्याचा पगारा ऐवढी रक्कम दिवाळी बक्षीस म्हणून मिळणार, तसेच दर वर्षी तीन गणवेश.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.