Pimpri news: आंद्रा व भामा-आसखेड प्रकल्पाच्या खर्चासह 205 कोटींच्या विकासकामांना स्थायी समितीची मान्यता

एमपीसी न्यूज -आंद्रा व भामा आसखेड धरणातील जॅकवेलपासून नवलाख उंबरे पर्यंत पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी जलवाहिनी टाकणेच्या कामासाठी येणा-या 61 कोटी तर नवलाखउंबरे पासून देहू बंधा-यापर्यंत जलवाहिनी टाकण्यासाठी येणा-या 101 कोटी रुपये खर्चासह कोटी विविध विकास कामांच्या अशा सुमारे 205 कोटी रुपयांच्या खर्चास स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

स्थायी समिती सभागृहात आज (बुधवारी) झालेल्या या सभेच्या अध्यक्षस्थानी संतोष लोंढे होते.

पालिकेच्या विविध विभागांसाठी आवश्यक 140 संगणक संच खरेदीकामी येणा-या सुमारे 52 लाख 8 हजार, पालिकेच्या क, ड, ई व ह प्रभागातील मैलाशुध्दीकरण केंद्रे व मैलापाणी पंप हाऊसचे इमारतीवर उर्जा निमितीकामी सोलर सिस्टीम बसविणे व अनुषंगीक कामे करणेकामी येणा-या सुमारे 66 लाख 96 हजार रुपये, शालांत परीक्षा मार्च 2020 महानपालिकेच्या माध्यमिक विद्यालयातील दहावी शालांत परीक्षेत 80 टक्के पेक्षा जास्त गुण संपादन करणा-या गुणवंत विद्यार्थ्यांना व दिव्यांग विद्यार्थ्यांना बक्षीस रक्कम अदा करणेकामी येणा-या सुमारे 1 कोटी 5 लाख इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली.

प्रभाग क्रमांक 24 मधील भिंगारे कॉर्नर ते रत्नदिप कॉलनी (वाकड रोड) रस्त्याचे क्रॉक्रटीकरण करणेकामी येणा-या सुमारे 6 कोटी 56 लाख रुपयांच्या खर्चास, पिंपरीमधील साई चौक परिसर, बलदेवनगर, कैलासनगर व इतर परिसरातील जल निसारण व्यवस्था सुधारणा कामे करणेकामी येणा-या सुमारे 71 लाख 78 हजार रुपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आली.

कासारवाडी मैलाशुध्दीकरण केंद्रांतर्गत प्रभाग क्रमांक 8 मधील लांडगेनगर, राजवाडा परिसर, महाराष्ट्र कॉलनी व उर्वरीत भागात आवश्यकतेनुसार नविन ड्रेनेज लाईन टाकणेकामी येणा-या सुमारे 27 लाख 77 हजार रुपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.