Pimpri news: आण्णासाहेब पाटील यांना अभिप्रेत माथाडी कायदा करणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली – इरफान सय्यद

एमपीसी न्यूज – कै. आण्णासाहेब पाटील यांना अभिप्रेत माथाडी कायदा व कामगार निर्माण करणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे मत महाराष्ट्र मजदूर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य माथाडी कामगार सल्लागार समिती सदस्य, शिवसेना सहसंपर्कप्रमुख इरफान सय्यद यांनी व्यक केले.

माथाडी कामगारांचे दैवत स्व. आण्णासाहेब पाटील यांची आज (मंगळवारी) पुण्यतिथी. त्यानिमीत्ताने केसबी चौकातील स्व. आण्णासाहेब पाटील यांच्या पुतळ्याला महाराष्ट्र मजदूर संघटनेच्या वतीने अभिवादन करण्यात आले. त्यावेळी सय्यद बोलत होते.

संघटनेचे सल्लागार बाळासाहेब शिंदे, पुणे माथाडी बोर्ड सदस्य परेश मोरे , पिंपरी-चिंचवड माथाडी बोर्ड सदस्य प्रविण जाधव, भिवाजी वाटेकर, खंडु गवळी, पांडुरंग काळोखे, सर्जेराव कचरे, आप्पा कौधरी, सतीश कंठाळे गोरक्ष दुबाले, आबा मांढरे, समर्थ नायकवडे तसेच माथाडी कामगार उपस्थित होते.

इरफान सय्यद पुढे म्हणाले, पिंपरी-चिंचवड शहरासोबतच पुणे जिल्ह्यात महाराष्ट्र मजदूर संघटना ही आण्णासाहेब पाटील यांना अभिप्रेत असणा-या माथाडी कायद्याची अमंलबजावणी करण्यासाठी कार्यरत आहे. माथाडी कामगारांच्या समस्या व प्रश्न माथाडी मंडळाच्या माध्यमातून सोडवून आपल्या माथाडी कामगार बांधवांना न्याय देण्याचा प्रयत्न महाराष्ट्र मजदूर संघटना व त्यांचे पदाधिकारी करीत आहे.

आमचे दैवत स्व.आण्णासाहेब पाटील यांना अभिप्रेत असणारा माथाडी कायदा व माथाडी कामगारांचे सुखमय जिवन त्यांना देण्यासाठी मी व माझी महाराष्ट्र मजदूर संघटना प्रयत्नशील राहील हीच खरी स्व.आण्णासाहेब पाटील यांना पुण्यतिथी दिनानिमित्ताने श्रद्धांजली राहिल, असे सय्यद यांनी सांगितले

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.