Pimpri corona news: इंग्लंडहून दहा दिवसांपूर्वी शहरात आलेल्या युवकाचे रिपोर्ट पाॅझिटीव्ह

एमपीसी न्यूज – कोरोनाचा नवीन विषाणू आढळलेल्या इंग्लंड देशातून दहा दिवसांपूर्वी पिंपरी-चिंचवड शहरात आलेल्या एका 35 वर्षीय युवकाचा रिपोर्ट कोरोना पाॅझिटीव्ह आला आहे. त्याच्यावर नवीन भोसरी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर, 19 जणांचे अहवाल प्रलंबित आहेत. 70 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.

याबाबतची महिती महापालिकेचे अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे यांनी दिली. इंग्लंडमध्ये कोरोनाची दुसरी लाट सुरू झाली आहे. कोरोना विषाणुच्या जनुकीय रचनेत काही बदल झालेला नवीन विषाणू स्ट्रेन आढळला आहे. त्याचा प्रसार अधिक वेगाने होऊ शकतो, असे तज्ज्ञांचे मत आहे.

या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या आदेशानुसार 24 नोव्हेंबरनंतर इंग्लंडहून शहरात आलेल्या व्यक्तींचा शोध महापालिका प्रशासनाने सुरू केला आहे.

पथकाने पाहणी केल्यानंतर 35 वर्षीय युवकात कोरोनाची लक्षणे आढळली. त्याच्या घशातील व नाकातील द्रावाचे नमुने तपासण्यात आले. त्याचा रिपोर्ट पाॅझिटीव्ह आला आहे. त्याच्यावर नवीन भोसरी रुग्णालयात उपचार सुरू आहेत, असे सांगितले.

इंग्लंड येथून एकूण 115 प्रवासी आले होते. या सर्वांचा शोध घेतला आहे. त्यापैकी 15 प्रवासी पिंपरी-चिंचवड शहाराबाहेर निघून गेले आहेत. 15 प्रवाशांचे पत्ते अपूर्ण असल्यामुळे त्यांच्यापर्यंत अजून प्रशासन पोहोचले नाही. 85 प्रवाशांची आरटीपीसीआर तपासणी केली आहे.

त्यापैकी 70 अहवाल निगेटिव्ह असून 1 अहवाल पॉझिटिव्ह आहे. उर्वरित 15 अहवाल अजून येणे बाकी आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.