Pimpri News: ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहीमेअंतर्गत 43 टक्के नागरिकांची तपासणी पूर्ण, साडेतीन लाख घरांना भेटी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाची साखळी तोडण्यासाठी महापालिकेच्या वतीने ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही मोहीम शहरभर राबविणेत येत आहे. या मोहीमेसाठी 1349 सर्व्हेक्षण पथके शहरात कार्यरत असून त्यांच्यामार्फत आजअखेर एकुण 3 लाख 49 हजार कुंटुबांतील 10 लाख 45 हजार नागरिकांची तपासणी पुर्ण करण्यात आली आहे. याबाबतची माहिती सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी दिली.

कोविड 19 नियंत्रणासाठी तसेच मृत्युदर कमी करण्यासाठी व कोविडमुक्त महाराष्ट्र मोहिमे अंतर्गत ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही मोहिम राबविण्‍याची सूचना राज्य शासनाने दिली असून त्या अंतर्गत गृहभेटी देवून नागरिकांना आरोग्य शिक्षण व त्यांची आरोग्य तपासणी करण्यात येत आहे.

कोरोना महामारीची साखळी तोडण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात “माझे कुटुंब माझी जबाबदारी” ही मोहीम महापालिकेच्या वतीने राबविण्यात येत असून या मोहिमेसाठी नागरिकांनी स्वतः हुन पुढाकार घेत या मोहीमेला आजपर्यंत उस्फुर्त असा प्रतिसाद दिला आहे.

नागरिकही मनात कोणताही संकोच न ठेवता आपल्या बरोबरच आपल्या कुटुंबांची तपासणी करून घेत आहेत. तसेच प्रत्यक्ष गृहभेट देणाऱ्या महापालिकेच्या टीम ला सहकार्य देखील करीत असुन ही मोहीम यशस्वीपणे राबविण्यात मदत होत आहे.

शहराची एकुण लोकसंख्या 24 लाख 4 हजाराच्या जवळपास असुन या लोकसंख्येच्या 43 टक्के म्हणजेच 10 लाख 45 हजार नागरिकांची तपासणी पुर्ण झाली आहे. यामध्ये 35 हजार 83 नागरिक कोमॉर्बिड आढळून आले आहेत. तरी पुढील 10 दिवसात उर्वरीत नागरिकांची तपासणी करण्यात येणार असल्याने नागरिकांनी गृहभेटी देणाऱ्या महापालिकेच्या पथकास सहकार्य करावे, असे आवाहन देखील सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.