Pimpri News :  पिंपरीगावच्या ग्रामदैवतांच्या मूर्तींची आज ग्रामप्रदक्षिणा

एमपीसी न्यूज – पिंपरीवाघेरे गावाचे ग्रामदैवत (Pimpri News)  श्री काळभैरवनाथ महाराज मंदीर जिर्णोद्धार श्री काळभैरवनाथ महाराज, श्री विठ्ठल रुक्मिणी व श्री गुरूदत्त महाराज यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापनानिमित्त बुधवारपासून विविध धार्मिक कार्यक्रम होत आहेत.दररोज अन्नदान होत आहे. आज मूर्तींची ग्रामप्रदक्षिणा होणार असून या मिरवणुकीत उंट, घोडे, झांज, ढोल-ताशा पथक तसेच बॅंड पथक सहभागी असणार आहे.    सोमवारी शेवटच्या दिवशी सुमारे 25 हजार भाविकांसाठी अन्नदानाची व्यवस्था करण्यात आली आहे. समस्त ग्रामस्थ पिंपरीवाघेरे यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

22 मार्च 2023  ते सोमवार 27 मार्च 2023 पर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. आज (शनिवार) दिनांक 25 रोजी कर्म प्रारंभ, गणपती पूजन पुण्याहवाचन मंडल स्थापना, जलाधिवास कर्नाटक येथील (Pimpri News) गुरुजी द्वारा मंडप पूजन व मंदिराचे वास्तुशांती कर्म व इतर धार्मिक कार्यक्रम भैरवनाथ महाराज करिता रुद्र यागाचे कर्म व इतर धार्मिक कार्यक्रम होणार आहे.  सायंकाळी चार ते रात्री नऊ वाजेपर्यंत सर्व देवतांची शोभायात्रा मिरवणूक काढण्यात येणार आहे व दीपोत्सव आरती केली जाणार आहे. धान्यधिवास, तावन्यास होम, महाप्रसाद याप्रमाणे कार्यक्रम होणार आहेत. उद्या (रविवारी) श्री कालभैरवनाथ नाथ साहेब यांच्या करिता रुद्र आवर्तन रुद्र याग इतर धार्मिक कार्यक्रम सकाळी सात ते रात्री नऊ वाजेपर्यंत होणार आहेत.

 

Pune Crime News : व्यायामशाळा प्रशिक्षकाला मारहाण करुन लुटणार्‍या चोरट्यांना अटक

 

सोमवार  स्थापित देवतांचे हवनकर्म प्रधान देवता हवन स्थिर लग्नावर देवांची प्राणप्रतिष्ठा होईल. महापूजा उत्तर पूजा नैवेद्य, आरती गुरुवर्य ह भ प उल्हास महाराज सूर्यवंशी यांचे कीर्तन आणि महाप्रसाद असा कार्यक्रम होणार आहे. स्थापित देवतांचे हवनकर्म प्रधान देवता हवन व प्राचीन वैदिक सिद्धांतानुसार स्थिर लग्नावर देवाची श्रीमद जगदुरु शंकराचार्य श्री विद्या विश्वेश्वर भारती महास्वामीजी कुडली शृंगेरी मठ बेंगलोर कर्नाटक व श्री दत्त अवतार आप्पा बाबा महाराज रुईमोर दत्त मंदिर संस्थांचे अधिपती धाराशिव, श्री क्षेत्र नारायणपूर पुणे येथील श्री दत्त मंदिराचे संस्थापक अण्णा महाराज, उल्हास महाराज सूर्यवंशी, शांती ब्रह्म मारुती युवा कु-हेकर यांच्या दिव्य सानिध्यात या देवतांची प्राणप्रतिष्ठा महापूजा व कलश पूजन होणार असल्याचे समस्त ग्रामस्थांच्या वतीने (Pimpri News) कळविण्यात आले आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.