Pimpri News : वाकडमध्ये गांजासह तरुणाला अटक

एमपीसी न्यूज – गांजा विक्रीसाठी आलेल्या एका तरुणाला अंमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली. त्याच्याकडून एक किलो गांजा, दुचाकी, मोबाईल फोन जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई काल (दि. 31) दुपारी कावेरीनगर वाकड (Pimpri News) येथे करण्यात आली.
राजेंद्र उर्फ राजू उर्फ पप्पू अभिमान जाधव (वय 29, रा. वाकड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याने निलेश सुकळे (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) याच्याकडून गांजा आणला असल्याचे निष्पन्न झाल्याने निलेश विरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस शिपाई प्रसाद जंगीलवाड यांनी याप्रकरणी वाकड (Pimpri News) पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेंद्र याने निलेश याच्याकडून विक्रीसाठी गांजा आणला. याबाबत पोलिसांना माहिती मिळाली असता पोलिसांनी राजेंद्र याच्या घराजवळ सापळा (Pimpri News) लावून त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे एक किलो पेक्षा अधिक गांजा, एक दुचाकी आणि एक मोबाईल फोन असा 1 लाख 25 हजार 200 रुपयांचा ऐवज आढळला. वाकड पोलीस  तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.