Ravet News: वासरू चोरून नेताना पोलिसांनी कसाईसह दोघांना केले अटक

एमपीसी न्यूज – मॉर्निंग वॉकला गेलेल्या पोलीस नाईक यांनी कसाई व दोन साथीदारांना  वासरू चोरून नेताना रंगेहाथ पकडले आहे. हा प्रकार रावेत येथे आज रविवारी (दि.1) सकाळी झाली आहे.

कसाई आयफाद कुरेशी (रा. चिंचवड) त्याचा साथीदार  हर्षद कुरेशी (रा. खराळवाडी, पिंपरी) तसेच त्यांना मदत करणारा रिक्षा चालक कादर सय्यद यांना पोलीस नाईक अमोल खुडे यांनी मोठ्या शिताफीने अटक केले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खुडे हे विकासनगर येथे सकाळी साडे सात वाजता मॉर्निंग वॉकला जात होते. (Ravet News) रावेत येथील बी आर टी रोड जवळील क्वीन्स टॉवर जवळ आले असता. त्यांना एक रिक्षा जोरात वेगाने जात असलेली दिसली. त्यांना संशय आल्याने त्यांनी रावेत पोलीस ठाण्यात कळवले. त्यानंतर लगेच पोलीस टिम आली व त्यांनी रिक्षा पकडली. यावेळी रिक्षात वासरू नेत असल्याचे दिसले.

पोलीस नाईक अमोल खुडे म्हणाले की, “मी देहू रोड मधील विकासनगर मध्ये राहतो पण आजूबाजूला दाट लोकवस्ती असल्याने मी आकुर्डी येथील गणेश तलाव येथे मॉर्निंग वॉक करायला जात असतो. नेहमी प्रमाणे आज माझ्या मोटर सायकलवरून तिकडे जात होतो. त्यावेळेस सांगवी-किवळे बी आर टी रोड वर क्वीन्स टॉवर जवळ सकाळी 7.15 वा च्या सुमारास एक अति वेगाने रिक्षा जाताना दिसली. मला संशय आल्याने मी पोलीस कंट्रोल रूमला कळवले. माझी दुचाकी आडवी घालून रिक्षा थांबवली. रावेत पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी तेथे आले. रिक्षा चालक व इतर दोन तरुण वासरू घेऊन जात होते. त्यांना पोलीस ठाण्यात नेले आहे.”

पोलिसांनी 3 युवकांना ताब्यात घेतले असून रावेत पोलीस ठाण्यात चौकशी चालू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.