Ravet : काही रुपये वाचवण्याच्या प्रयत्नात गमावले 3 लाख 83 हजार रुपये

एमपीसी न्यूज – क्रेडीट कार्डचे वार्षिक देखभाल शुल्क वाचवण्यासाठी (Ravet) एक उपाय सांगतो असे म्हणून अनोळखी व्यक्तीने महिलेची तीन लाख 83 हजार 551 रुपयांची फसवणूक केली. ही घटना 2 फेब्रुवारी रोजी रावेत येथे घडली.

याप्रकरणी महिलेने रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार 7479500372, 8637242326 या क्रमांक धारकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Talegaon : वेश्या व्यवसाय प्रकरणी एकास अटक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी महिलेला फोन करून क्रेडीट कार्ड वार्षिक देखभाल शुल्क कट न होण्यासाठी नेट बँकिंग लॉगीन करण्यास सांगितले. काही पर्याय बदल करावे लागतील म्हणून एक अॅप डाउनलोड करण्यास (Ravet) सांगितले. ते अॅप महिलेने डाउनलोड केले असता त्यांच्या नावावर तीन लाख 83 हजार 551 रुपये कट करून घेत त्यांची फसवणूक केली. रावेत पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.