Pimpri : पिंपरी-चिंचवडमध्ये स्वच्छ तीर्थ अभियान व सखोल स्वच्छता मोहिमेचे आयोजन

एमपीसी न्यूज – शहरातील सर्व भागात सखोल स्वच्छता मोहीम (Pimpri) राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत दि.18 जानेवारी ते 27  जानेवारी या कालावधीमध्ये दररोज सकाळी 7 ते दुपारी 2 या वेळेत सखोल स्वच्छता मोहिम आयोजित करण्य़ात आली आहे. त्यानुसार मार्गदर्शन प्रणाली तयार करण्यात आली असून त्यानुसार रस्त्यांची सखोल स्वच्छता करण्यात येणार आहे. यामध्ये रस्ते, चौक व परिसर स्वच्छ करण्यात येत आहेत.  रस्त्यावरील माती, कचरा गोळा करुन रस्त्याचे दुभाजक पाण्याने धुण्यात येत आहेत.

त्याअनुषंगाने आज सकाळी 7 वाजता  भक्ती  शक्ती चौक, निगडी येथे सखोल स्वच्छता मोहिमेचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले. यावेळी  आमदार उमा खापरे, महापालिका आयुक्त शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण, सह शहर अभियंता प्रमोद ओंबासे, उप आयुक्त मनोज लोणकर,अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ.अभय दादेवार, सहाय्यक आयुक्त यशवंत डांगे, क्षेत्रीय अधिकारी सुचिता पानसरे, उमेश ढाकणे, सिताराम बहुरे, श्रीनिवास दांगट, आरोग्य कार्यकारी अधिकारी गणेश देशपांडे, कार्यकारी अभियंता हरविंदरसिंह बन्सल, विलास देसले, विजयकुमार काळे, बापु गायकवाड, नितीन निंबाळकर, विनय ओहोळ, बेळगावकर, अजय मांढरे, सोहन निकम,  जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक,माजी नगरसदस्य तानाजी खाडे, सचिन चिखले, शांताराम भालेकर, तसेच महापालिकेच्या स्वच्छ भारत अभियानाच्या ब्रँड ॲम्बेसिडर संगिता जोशी, सामाजिक कार्यकर्ते व महापालिका अधिकारी, कर्मचारी, सफाई कर्मचारी, आय.ई.सी. संस्थांचे सदस्य आणि नागरिक उपस्थित होते.

तसेच अयोध्येमध्ये  22 जानेवारीला होणाऱ्या प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापनेच्या पार्श्वभुमीवर धार्मिक स्थळे व तेथील परिसरात स्वच्छता अभियान राबविण्याचा आदेश भारत सरकारच्या आवासन आणि शहरी कार्य मंत्रालयाच्या वतीने महापालिकेला दिला आहे.

त्यानुसार केंद्र सरकारच्या “स्वच्छ भारत अभियान” अंतर्गत पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने “स्वच्छ तीर्थ अभियान ” राबविण्यास सुरूवात केली आहे. या अंतर्गत 21 जानेवारीपर्यंत शहरातील 53 मुख्य धार्मिक स्थळे व त्याच्या आजुबाजुच्या परिसराची सखोल स्वच्छता अभियान राबविण्यात येत  आहे. त्याचा शुभारंभ मोरया गोसावी मंदिर व तेथील परिसर स्वच्छतेने आज रोजी सकाळी 9 वाजता करण्यात आला.

यावेळी खासदार श्रीरंग उर्फ आप्पा बारणे, आमदार उमा खापरे, महापालिका (Pimpri) आयुक्त शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ.लक्ष्मण गोफणे, सहाय्यक आयुक्त यशवंत डांगे, आरोग्य कार्यकारी अधिकारी गणेश देशपांडे, क्षेत्रीय अधिकारी अमित पंडीत, उमेश ढाकणे, कार्यकारी अभियंता संध्या वाघ, जहिरा मोमीन, प्रेरणा सिनकर, सुनिल बागवानी, मनोहर जावरानी, सतीश वाघमारे, कुंभार, सोहन निकम, संजय चव्हाण, माजी नगरसदस्य चंद्रकांत नखाते, शत्रुघ्न काटे, मोरेश्वर शेडगे, अश्विनी चिंचवडे, कर्मचारी महासंघाचे मनोज माछरे तसेच सर्व सामाजिक कार्यकर्ते व महापालिका अधिकारी, कर्मचारी, सफाई कर्मचारी, आय.ई.सी. संस्थांचे सदस्य आणि नागरिक उपस्थित होते.

स्वच्छ भारत अभियानामध्ये पिंपरी चिंचवड शहरास कचरामुक्त शहरामध्ये 5 तारांकित मानांकन प्राप्त झाले असून स्वच्छ सर्व्हेक्षण 2023 मध्ये देशात 13 वा व राज्यात 3 रा क्रमांक प्राप्त झाला आहे. याचे श्रेय महापालिकेतील सर्व नागरिक, अधिकारी व कर्मचारी, सफाई कर्मचारी, विविध सामाजिक संस्था, शाळा, बचत गट  यांचे आहे. तरी सर्वांना आवाहन करण्यात येत आहे की शासनाच्या निर्देशाप्रमाणे महापालिकेमध्ये विविध स्वच्छता मोहिम व उपक्रम राबविले जातात. त्यामध्ये सहभागी होऊन महापालिकेस सहकार्य करावे असे आवाहन आरोग्य विभागप्रमुख यशवंत डांगे यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.