Maval : पोलीसात तक्रार दिली म्हणून वहिनीची हत्या करून प्रेत पुरले शेतात, दिरासह महिलेला अटक

एमपीसी न्यूज – पोलिसांत तक्रार दिली (Maval) म्हणून डोक्यात दगड घालून स्वतःच्याच वहिनीची हत्या करत तिचे प्रेत शेतात पुरल्याचा धक्कादायक प्रकार मावळातील चांदखेड येथे घडला आहे. हि घटना मंगळवारी (दि.16) सकाळी दहा ते अकरा या कालावधीत घडली.

याप्रकरणी शिरगाव परंदवाडी पोलिसांनी दिर लक्ष्मण रामभाऊ चव्हाण (वय 32 ) व महिला आरोपी यांना अटक केली आहे तर गणेश उर्फ लहू रामभाऊ चव्हाण याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी शिरगाव परंदवाडी पोलीस ठाण्यात मयत महिलेचा भाऊ शाम नामदेव चव्हाण (वय 28, रा. भोर, पुणे) यांनी शुक्रवारी फिर्याद दिली आहे.

Chinchwad : खासदार श्रीरंग बारणे यांची मोरया गोसावी मंदिरात स्वच्छता मोहीम

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बहिणीचा फोन लागत नाही तसेच ती घरी नाही म्हणून मयत महिलेच्या घरच्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी सासरच्यांकडे चौकशी करण्यास सुरुवात केली असता (Maval) हा सारा प्रकार उघडकीस आला.

आरोपी गणेश हा मयत महिलेचा दिर होता. त्याच्या विरोधात मयत महिलेने तीन वर्षापुर्वी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यावेळी पोलिसांनी आरोपीला अटक केले होते. याच रागातून आरोपींनी स्वतःच्या वहिनीच्या डोक्यात दगड घालून खून केला व पुरावा नष्ट कऱण्यासाठी म्हणून प्रेत त्यांनी चांदखेड य़ेथील डोंगरा लगत जमिनीमध्ये पुरले.

मात्र पोलिसांसमोर जास्त काळ गुन्हा लपू शकला नाही व सर्व सत्य समोर येताच पोलिसांनी आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. याचा पुढील तपास शिरगाव परंदवाडी पोलीस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.