Pimpri : जोशपूर्ण सादरीकरणाने पार पडली मनाचे श्लोक अंतरशालेय स्पर्धेची अंतिम फेरी

एमपीसी न्यूज – सुमारे 4000 विध्यार्थ्यानी सहभाग नोंदवलेल्या व दोन महिने निरंतर सुरु असलेल्या अंतर शालेय मनाचे श्लोक स्पर्धेची अंतिम फेरी काल (दि. ९) रोजी निगडी येथे जोशपूर्ण सादरीकरणाने पार पडली.

समर्थ भारत अभियान आयोजित मनाचे श्लोक अंतरशालेय स्पर्धंतून अंतिम फेरी गाठलेल्या २२० विद्यार्थानीं आपले पाठांतराचे कौशल्य दाखवत मान्यवरांची मने जिंकली. दोन महिने चाललेल्या या स्पर्धेसाठी शहरातील विविध शाळेतून बालवाडी ते दहावी पर्येंतच्या सुमारे ४००० विद्यार्थानीं आपला सहभाग नोंदवला होता. बालगट व मोठा गट अशी बालवाडी ते दहावी पर्येंतच्या विध्यार्थ्याची सहा गटात विभागणी करण्यात अली होती. अंतिम फेरी गाठलेल्या २२० विध्यार्थ्याची अंतिम फेरी काल निगडीच्या मॉडर्न शाळेत पार पडली.

अफलातून पाठांतर आणि उत्तम सादरीकरण केलेल्या विध्यार्थ्यानीं उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. प्रत्येक गटातून पहिले तीन क्रमांक पटकावणाऱ्या आणि उत्तेजनार्थ विध्यार्थ्यानां यावेळी बक्षीस देऊन गौरवण्यात आले. विशेष सादरीकरण आणि पाठांतराचे कौशल्य दाखवणार्या श्रेयश घारपुरे, श्रितिश काळे, सोहम पडवेकर इ. विद्यार्थांचे यावेळी विषेश कौतुक करण्यात आले. सज्जनगडहून अजयबुवा रामदास, पत्राद्वारे दासबोध अभ्यास याचे पुणे केंद्राचे अध्यक्ष सुहास क्षीरसागर, जयंत कुलकर्णी इ. मान्यवर या निमित्ताने उपस्थित होते.

मन हे सॉफ्टवेअर आहे आणि शरीर हे हार्डवेअर आहे आणि हे जर सुरक्षित ठेवायचे असेल तर अँटीव्हायरस म्हणून मनाचे श्लोक आणि दासबोध डाऊनलोड करुन नेहमी त्याच्या संपर्कात रहायला हवे असे मत या वेळी कार्यक्रमाच्या आयोजकानीं व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रिया जोग यांनी केले तर आनंद देशमुख यांनी आभार प्रदर्शन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.