Pimpri : वसुंधरा दिनानिमित्त  केशर जातीच्या आंब्याच्या रोपाचे वृक्षारोपण

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने जागतिक ( Pimpri) वसुंधरा दिनाचे औचित्य साधून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.  अक्षय तृतीया या सणाच्या व जागतिक वसुंधरा दिनानिमित्त  केशर जातीचा आंबा या वृक्षाच्या रोपाचे वृक्षारोपण करण्यात आले.

या कार्यक्रमासाठी आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, माहिती व जनसंपर्क विभाग व उद्यान विभागाचे उपायुक्त रविकिरण घोडके, ई क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त राजेश आगळे, उद्यान अधीक्षक गोरख गोसावी, सहाय्यक उद्यान अधीक्षक मंजुषा हिंगे, राजेश वसावे, ग्रीन यात्रा या सेवाभावी संस्थेचे ( Pimpri ) संस्थापक डॉ. प्रदीप त्रिपाठी व उद्यान विभागाचे अधिकारी, मुकादम, कर्मचारी तसेच नागरिक, जेष्ठ नागरिक, आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे वेळी आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते अक्षय तृतीया या सणाच्या व जागतिक वसुंधरा दिनानिमित्त  केशर जातीचा आंबा या वृक्षाच्या रोपाचे वृक्षारोपण करण्यात आले.  उपस्थितांनी माझी वसुंधरा या उपक्रमांतर्गत पृथ्वीच्या संरक्षणाची त्याचबरोबर पर्यावरणाच्या संरक्षणाची,झाडे लावण्याची सामूहिक शपथ घेतली.

PMRDA : पीएमआरडीए अनधिकृत बांधकामावर ‘ड्रोन’द्वारे ठेवणार नजर

 

यानंतर ग्रीन यात्रा या सेवाभावी संस्थेचे संस्थापक डॉ. प्रदीप त्रिपाठी यांनी माहिती देताना सांगितले  ग्रीन यात्रा या संस्थेमार्फत कै. रामभाऊ गबाजी गवळी बालोद्यान दिघी उद्यान येथे 18 एकर क्षेत्रावर  मियावाकी पद्धतीने झाडांची लागवड करण्यात येत असून त्यातील पहिल्या टप्यातील झाडांना एक वर्ष झाले असून या एकाच वर्षात झाडांची वाढ पाच ते सहा फुटापर्यंत झाल्याचे दिसून येत आहे.  या झाडांची अतिशय चांगल्या पद्धतीची सधन लागवड आहे. यामध्ये स्थानीय प्रजातीच्या झाडाची लागवड येथे करण्यात आली असून एक प्रकारे जैव विविधता जपण्याचे काम सुरु आहे.    यावेळी यांनी संपूर्ण प्रकल्पाची माहिती सादर केली. त्याचबरोबर भविष्यातील असणाऱ्या लागवडीबाबत माहिती दिली.

आयुक्त सिंह म्हणाले, नागरिकांनी पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी उपलब्ध संसाधनांचा व्यवस्थित वापर करणे आवश्यक आहे  व जास्तीत जास्त झाडे लावून  वृक्षसंवर्धन व त्याचबरोबर वृक्षारोपण करण्याची काळाची गरज आहे, असे प्रतिपादन केले. विविध सेवाभावी संस्था, सी एस आरच्या माध्यमातून औद्योगिक कंपन्या यांनी पुढाकार घेऊन शहरात जास्तीत जास्त वृक्षारोपण करून पर्यावरणाचा समतोल राखण्यात आपले योगदान द्यावे.

त्याचबरोबर नागरिकांनी दैनंदिन इ-व्हेईकल चा वापर करावा जेणेकरून प्रदूषण कमी होण्यास मदत होईल. त्याचबरोबर सौर ऊर्जेचा वापर करावा . वीज आणि पाण्याचा वापर नागरिकांनी काटकसरीने करावा.  जल, जमीन जंगल हे संसाधन अत्यंत महत्वाचे आहेत  यांचा योग्य वापर करणे काळाची गरज आहे. नागरिकांनी इमारतीचे बांधकाम करत असताना रेन वाटर हार्वेस्टिंग याचा समावेश करावा. यावर्षीची जागतिक वसुंधरा दिनाची संकल्पना  इन्व्हेस्ट इन अवर अर्थ प्लॅनेट अशी आहे मधमाशी हा जगातील अत्यंत महत्वाचा कीटक असून त्यामध्ये मधमाशा ह्या परागीकरण करण्यासाठी मदत करत असतात.

मोठ्या प्रमाणात फळे व अन्यधान्य यांची निर्मिती परागीकरणातून होत असते. त्यामुळे मधमाशांचे जतन करण्याची काळाची गरज आहे. मधमाश्यांची संख्या वर्षानुवर्षे कमी होत आहे. भविष्यामध्ये मधमाशा नाही राहिल्या तर प्राणीजात सुद्धा नष्ट होण्याचा धोखा उद्भवू शकतो. यामुळे जास्तीत जास्त पद्धतीने मधमाश्यांचे संवर्धन करणे गरजेचे आहे. मधमाशी हा जरी लहान कीटक असला तरी परागीकरण करण्याचा अत्यंत महत्वाचा ( Pimpri) घटक आहे. या साठी सर्व नागरिकांनी पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी मदत करावी  असे आवाहन आयुक्त्यांनी केले.
यावेळी कार्यक्रमाचे सूत्र संचालन उपायुक्त रविकिरण घोडके ( Pimpri ) यांनी केले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.