PMRDA : पीएमआरडीए अनधिकृत बांधकामावर ‘ड्रोन’द्वारे ठेवणार नजर

एमपीसी न्यूज – पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण कार्यालयामध्ये ( PMRDA ) आधुनिक तंत्रज्ञान अंतर्गत ड्रोन प्रणाली मागील वर्षी ऑगस्ट 2022 पासून वापरण्यात येत आहे. यामध्ये प्रामुख्याने नगर रचना योजना, सुविधा भूखंड हस्तांतर प्रकिया, अनधिकृत बांधकामावर नजर ठेवण्याकरिता ड्रोन प्रणालीचा वापर करण्यात येत आहे. पीएमआरडीए हद्दीत सुमारे 814 गावांचा समावेश असून एवढ्या मोठ्या क्षेत्राची निगराणी ठेवण्याकरिता पीएमआरडीए कार्यालयाकडून DGPS तसेच CORS असलेले  अद्यावत तंत्रज्ञान असलेले ड्रोन खरेदी करण्यात आलेले आहे.

अद्यावत तंत्रज्ञान असलेल्या ड्रोनचे आयुक्त राहुल महिवाल, अतिरिक्त आयुक्त दिपक सिंघला  यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी केंद्र शासन तसेच राज्य शासनातील विविध विभागातील मान्यवराचे मार्गदर्शन आयोजित करण्यात आले होते. महाराष्ट्र सुदूर संवेदन उपयोजन केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. संजय पाटील, अधीक्षक सर्व्हेअर एस. त्रिपाठी, जिल्हा अधीक्षक सुर्यकांत मोरे, नगर रचना विभागाचे सह संचालक राजेंद्र पवार उपस्थित होते.

Pimpri : महात्मा बसवेश्वर यांनी स्त्री-पुरुष समानतेचा संदेश दिला – अतिरिक्त आयुक्त जगताप

DGPS तसेच CORS या अद्यावत तंत्रज्ञान असलेला ड्रोन अधिक कार्यक्षम पद्धतीचा असून  पीएमआरडीए कार्यालयामध्ये नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान अद्यावत करण्यात आलेले आहेत.  पीएमआरडीए कार्यालयातील ड्रोन कक्षाकरीता विशेष कौशल्य असलेले तज्ञ व्यक्तीची नेमणुका करण्यात आली आहे. हा कक्ष उप जिल्हाधिकारी तथा विशेष कार्य अधिकारी  रामदास जगताप यांच्या नियंत्रणाखाली कार्यरत असून व या कक्षात डॅा. प्रितम वंजारी मुख्य भौगोलिक माहिती तज्ञ म्हणून कार्यरत ( PMRDA ) आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.