Pimpri : महात्मा बसवेश्वर यांनी स्त्री-पुरुष समानतेचा संदेश दिला – अतिरिक्त आयुक्त जगताप

एमपीसी न्यूज – प्रत्येक माणसाला जीवन जगण्याची समान संधी मिळावी ( Pimpri )  त्यात कोणताही भेदभाव करण्यात येऊ नये याकरिता सतत कार्यरत असणारे थोर समाजसुधारक महात्मा बसवेश्वर यांनी बाराव्या शतकात समाजाला स्त्री-पुरुष समानतेबरोबरच एकात्मता, बंधुता, अहिंसा तसेच अंधश्रद्धा निर्मूलनाचा संदेश दिला, त्यांच्या व्यापक विचारसरणीचा वारसा आजही जोपासला जात आहे असे प्रतिपादन अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांनी केले.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीमधील त्यांच्या प्रतिमेस अतिरिक्त आयुक्त  जगताप यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी जनसंपर्क विभागाचे माहिती अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, सामाजिक कार्यकर्ते उमाकांत शेटे, अनिल बोचरे,अंदप्पा सक्करगी, ओंकार चिमेगामे, सतीश सोनटक्के, ईश्वंत रामशेटे,त्रिमुख येलुरे, उहावगी भुसारे, सोमनाथ धोंडे, महेश लोहारे,शंकर कापसे, संगमेश्वर गुंजोरे, विश्वनाथ पंचलिंग, गौडर, तोडकर, आर.एस. देशिंगे, सोमनाथ जानते, चंद्रकांत खोचरे,संगमेश्वर शिवपुत्रे, बाळासाहेब नाकाडे, बसवेश्वर कणजे, विलास बिराजदार, अजय कुरदळे शैलेश कुरदळे, शैलेश कुरदळे, सिध्दरामेश नावेदगेरे, राकेश आवटे आदित्य खोचरे आदी विविध सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Pimpri : पिंपरी चिंचवड शहरात जकात, फित्रा, खैरात करून मुस्लिम बांधवांनी रमजान ईद उत्साहात साजरी

अतिरिक्त आयुक्त जगताप म्हणाले महात्मा बसवेश्वर यांनी समाजातील सर्व घटकांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न केले. सर्वांनी एकत्र या ,चर्चा करा ,सुसंवाद साधा,सर्वांना समान संधी द्या,अंधश्रद्धेपासून दूर असा संदेश दिला. त्याचबरोबर संसारी माणसांना साधे,सहज सोपे जीवन जगता यावे यासाठी त्यांनी वेळोवेळी मार्गदर्शनही केले असे सांगून जगताप यांनी शहरवासियांना आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या वतीने  महात्मा बसवेश्वर जयंती,अक्षय तृतीया,रमजान ईद आणि वसुंधरा दिनानिमित्त शुभेच्छाही ( Pimpri ) दिल्या.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.