Pimpri : पिंपरी-चिंचवडकरांसाठी नवीन आयुक्तालयाच्या पोलीस नियंत्रण कक्षाचे संपर्क क्रमांक जाहीर

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरासाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालय 15 ऑगस्ट पासून कार्यान्वित करण्यात आले आहे. पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते ध्वजारोहण करून आयुक्तालय कार्यान्वित करण्यात आले. आता पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांना पोलिसांच्या कोणत्याही मदतीसाठी पुणे पोलीस आयुक्तालयाऐवजी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाशी संपर्क करावा लागणार आहे.

नागरिकांना संकटसमयी तसेच पोलिसांच्या मदतीसाठी 100 या क्रमांकावर संपर्क करता येतो. त्याचबरोबर केवळ पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय आणि आयुक्तालयाचे अधिकारी यांच्याशी संपर्क साधण्यासाठी तसेच पोलीस मदतीसाठी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाकडून नियंत्रण कक्षाचे संपर्क क्रमांक जाहीर करण्यात आले आहेत.

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे महत्वाचे संपर्क क्रमांक :

# पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांचे कार्यालय – 020 – 2745 0444 / 2745 0555

# अपर पोलीस आयुक्त मकरंद रानडे यांचे कार्यालय – 020 – 2745 0125

# पोलीस उप आयुक्त (परिमंडळ एक व दोन) – 020 – 2748 7777

# नियंत्रण कक्ष –
020 – 2745 0121
020 – 2745 0122
020 – 2745 0666
020 – 2745 0888
020 – 2745 8900
020 – 2745 8901

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.