_MPC_DIR_MPU_III

Talegaon : इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेच्या वतीने स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

प्रथमच सैन्य दलातील वरिष्ठ अधिका-यांच्या हस्ते ध्वजारोहण

एमपीसी न्यूज- इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेच्या इंद्रायणी कनिष्ठ, वरिष्ठ महाविद्यालय, बी बी ए, बी सी ए, तंत्रशिक्षण तसेच बी फार्मसी, डी फार्मसी संस्थांच्या संयुक्त विद्यमाने कॅन्टोमेंट बोर्डचे अध्यक्ष, ब्रिगेडियर ओ पी वैष्णव यांच्या हस्ते तळेगाव येथे ध्वजारोहण करण्यात आले. इंद्रायणी महाविद्यालयात सुवर्णमहोत्सवी वर्ष साजरे होत असताना प्रथमच सैन्य दलातील वरिष्ठ अधिका-यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

_MPC_DIR_MPU_IV

कार्यक्रमासाठी बी फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य बी बी जैन, डी फार्मसीचे प्राचार्य जी एस शिंदे, इंद्रायणी कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य सुनील ओव्हाळ, वरिष्ठ प्राध्यापक, महाविद्यालय सेवक आणि आजी माजी विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.

_MPC_DIR_MPU_II

या प्रसंगी बोलताना ब्रिगेडियर ओ पी वैष्णव म्हणाले, ” सैन्यदल, नौदल, हवाईदल हे तीनही दल देशाच्या सुरक्षेचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. विद्यार्थ्यांनी या सेवेमध्ये येऊन देशाची शान आणि मान राखावी. आज या क्षेत्रात तरूणांसाठी अनेक प्रकारच्या संधी उपलब्ध आहेत. आपल्या जवळच पुण्यामध्ये भारत देशातील सर्वोच्च शिखर संस्था एन डी ए (राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी) आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्य लढ्यातील वीरांची प्रेरणा घेऊन देशाच्या सरंक्षणासाठी पुढे यावे. तुमच्यामधूनच मोठे अधिकारी निर्माण व्हावेत हीच ख-या अर्थाने भारतीय स्वातंत्र्याला सलामी असेल”

इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे उपाध्यक्ष मुकुंदराव खळदे, ज्येष्ठ नेते संस्थेचे खजिनदार केशवराव वाडेकर, संस्थेचे सदस्य शैलेश शहा तसेच इंद्रायणी महाविद्यालय विकास समितीचे सदस्य विलास काळोखे, चंद्रभान खळदे, संदीप काकडे, संजय वाडेकर, संजय साने तसेच प्रसिद्ध उद्योजक रणजित काकडे, निरूपा कानिटकर, नंदकुमार शेलार, जयसिंग भालेराव, महेश बेंन्जामिन, प्राचार्य डाॅ. संभाजी मलघे, प्रा. एम एम ताटे, प्रा. गावडे, संभाजी शिंदे, प्रज्ञा दोशी, सुधा जोशी, पंकजा मोहिते आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

स्वातंत्र्य दिनी शुभेच्छा व स्वागत करताना प्राचार्य डाॅ मलघे म्हणाले की, इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेमध्ये अनेक महाविद्यालये नव्याने सुरू होत आहे. बी फार्मसी, डी फार्मसी महाविद्यालय गतवर्षी सुरू झाले आहे. संकुलामध्ये विज्ञान भवन स्थापन होणार आहे. इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे अध्यक्ष मावळ भूषण माजी आमदार कृष्णराव भेगडे व संस्थेचे कार्यवाह रामदास काकडे हे अद्ययावत शिक्षण सुविधा उपलब्ध करून देत आहेत. तीन हजार विद्यार्थी शिक्षण घेत असताना मावळ तालुक्यामधील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी संस्थेमार्फत शिक्षणाचे मोठे दालन उपलब्ध झाले आहे.

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.