Pimpri : पिंपरी ते निगडी मेट्रो मार्गाच्या कामाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न

एमपीसी न्यूज – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ( Pimpri) पिंपरी ते निगडी या मेट्रो मार्गाच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. कोलकाता येथून पंतप्रधान मोदी यांनी ऑनलाइन माध्यमातून हे भूमिपूजन केले. पीसीएमसी मेट्रोस्थानकावर हा भूमिपूजन समारंभ बुधवारी (दि. 6) संपन्न झाला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते महाराष्ट्र उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल आणि केरळ या राज्यातील सहा मेट्रो मार्गाचे उद्घाटन करण्यात आले. त्यासह पिंपरी येथे पिंपरी ते निगडी मेट्रो मार्गाचे भूमिपूजन झाले. एस्प्लानेड मेट्रो स्टेशन कोलकाता येथून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 15 हजार 400 कोटी रुपयांच्या मेट्रो प्रकल्पाचे ऑनलाईन माध्यमातून उद्घाटन करण्यात आले.

Mahavitran : महावितरणला आर्थिक गर्तेतून बाहेर काढण्यास तांत्रिक कर्मचारी सक्षम –अंकुश नाळे

आरआरटीएस मुरादनगर उत्तर प्रदेश, मजेरहाट मेट्रो पश्चिम बंगाल, पुणे मेट्रो रुबी हॉल क्लिनिक महाराष्ट्र, पुणे मेट्रो रामवाडी महाराष्ट्र, पुणे मेट्रो पीसीएमसी मेट्रो स्टेशन महाराष्ट्र, आगरा मेट्रो उत्तर प्रदेश, कवी सुभाष मेट्रो पश्चिम बंगाल येथे उद्घाटन समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या उद्घाटन समारंभासाठी राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

महामेट्रो कडून पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात मेट्रोच्या दोन मार्गिकांवर काम सुरु आहे. त्यातील काही भाग दोन टप्प्यांत प्रवासी वाहतुकीसाठी सुरु करण्यात आला आहे. या मेट्रोच्या कामाचे भूमिपूजन आणि दोन्ही टप्प्यातील उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले आहे. आता पिंपरी ते निगडी या विस्तारित मेट्रो मार्गाच्या कामाचे देखील उद्घाटन मोदी यांच्या हस्ते झाले.

Alandi : नारायणगाव व आळंदीमध्ये मोफत मराठा वधूवर परिचय मेळावा

स्वारगेट ते पिंपरी या मार्गीकेवरील दापोडीतील हॅरिस ब्रिजपासूनचा मेट्रो मार्ग पिंपरी-चिंचवड शहराच्या हद्दीत येतो. मेट्रो पिंपरी पर्यंत आली मात्र ती निगडी पर्यंत सुरु होणे आवश्यक असल्याची मागणी नागरिकांनी केली होती. त्यानुसार महामेट्रो कडून या विस्तारित मार्गाचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यात आला. त्याला राज्य शासनाची परवानगी मिळाली आणि हा अहवाल केंद्राकडे गेला. पिंपरी ते निगडी या विस्तारीकरणाला केंद्रीय गृहनिर्माण व नागरी कामकाज मंत्रालयाने 23 ऑक्टोबर 2023 रोजी मान्यता दिली.

पिंपरी स्थानकाजवळील एम्पायर इस्टेट पुलापर्यंत मेट्रो मार्गाचे काम झाले आहे. सध्या तिथे मेट्रो यार्ड आहे. तेथून पुढे मार्ग विस्तारीकरणाचे नियोजन आहे. पिंपरी ते निगडी दरम्यान4.4 किलोमीटर अंतरावर चिंचवड स्टेशन (महावीर चौक व अहिंसा चौक दरम्यान), आकुर्डीतील खंडोबा माळ चौक, निगडी (टिळक चौक व भक्ती-शक्ती चौक दरम्यान) अशी तीन स्थानके असणार आहेत. या कामासाठी 910 कोटी 18 लाख रुपये एवढा खर्च येणार आहे. बुधवारी उद्घाटन झाल्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे. हे काम 39 महिन्यांमध्ये पूर्ण होईल, असे सांगितले जात आहे.

पुणे शहरात रुबी हॉल क्लिनिक ते रामवाडी पर्यंतचा मेट्रो मार्ग आजपासून प्रवाशांसाठी खुला करण्यात आला. या मार्गाचे देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झाले. रुबी हॉल क्लिनिक मेट्रो स्टेशनच्या पुढे बंडगार्डन, कल्याणी नगर रामवाडी ही तीन मेट्रो स्टेशन सुरू करण्यात आली आहेत. तर येरवडा मेट्रो स्टेशनचे काम प्रगतीपथावर असून लवकरच हे काम पूर्ण होणार ( Pimpri) आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.