Pimpri : ‘ईव्हीएम हटाओ, आरटीआय बचाओ’साठी उद्या पिंपरीत निदर्शने

एमपीसी न्यूज – ईव्हीएम हटाओ, केंद्र सरकारने माहिती अधिकारात केलेले बदल मागे घ्यावेत. आगामी विधानसभा निवडणुका इलेक्ट्रॉनिक वोटींग मशीनव्दारे (ईव्हीएम) न होता. मतपत्रिकेव्दारे व्हाव्यात. या मागण्यासाठी ईव्हीएम हटाओ, आरटीआय बचाओ जनआंदोलन समितीच्या वतीने उद्या (गुरुवारी) पिंपरीत मोबाईल टॉर्च आणि निदर्शन आंदोलन होणार आहे. पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर गुरुवारी सायंकाळी पाच वाजता हे आंदोलन होणार आहे.

जनआंदोलन समितीचे मुख्य समन्वय मारुती भापकर म्हणाले, ” केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने माहितीचा अधिकार अधिनियम 2005 मध्ये बदल करुन माहिती आयोगाच्या स्वायतेवर घाला घातला आहे. हा कायदा निष्प्रभ केला. तसेच आपल्या देशात निवडणुकीमध्ये इलेक्ट्रॉनिक ओटींग मशीनव्दारे (ईव्हीएम) मतदान घेऊन निवडणुक प्रक्रिया पार पडते. त्यामध्ये मोठा गडबड घोटाळा व भ्रष्ट्राचार आहे. हे वारंवार प्रकाशात आले आहे. त्यामध्ये एकुणच निवडणूक प्रक्रियेवरती अविश्वास निर्माण होऊन लोकशाहीच धोक्यात आली आहे. त्यामुळे ईव्हीएमऐवजी मतपत्रिकेवर विधानसभेची निवडणूक घेण्याची आमची मागणी आहे. त्यासाठी आंदोलन करण्यात येणार आहे. नागरिकांनी मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी व्हावे” असे आवाहन भापकर यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.