Pimpri : कवी नीलेश म्हसाये यांच्या “रायगड” कवितेच्या भित्तीपत्रकाचे प्रकाशन

एमपीसी न्यूज – कवी नीलेश म्हसाये यांच्या “रायगड” या कवितेच्या भित्तीपत्रकाचे प्रकाशन छत्रपती मालोजीराजे भोसले यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी प्रिपरेटरी मिलिटरी स्कूल येथे करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक प्रा.तुकाराम पाटील होते तर, प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य सरचिटणीस अॅड. भगवान साळुंखे होते.

“रायगड” कविता भित्तीपत्रकाच्या माध्यमातून प्रत्येक शाळेत गेल्यास विद्यार्थ्यांमध्ये इतिहास तसेच गडकिल्ल्यांबद्दल प्रेम आणि जिव्हाळा निर्माण होईल. आमच्या सर्व शाळांमध्ये आम्ही हे भित्तीपत्रक लावू” असे प्रतिपादन श्रीमंत छत्रपती मालोजीराजे भोसले यांनी केले. “रायगडाची थोरवी विद्यार्थ्यासोबतच सर्वदूर जावी, या उद्देशानेच कवितेला भित्तीपत्रक स्वरुपात आणल्याचे कवी नीलेश म्हसाये यांनी सांगितले.

प्रा तुकाराम पाटील आणि अॅड. भगवानराव साळुंखे यांनी हा स्तुत्य उपक्रम असल्याचे मत नोंदवले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक निलेश म्हसाये यांनी केले. अक्षय मारो़डे यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.