Pimpri : आझम पानसरे सोशल फांऊंडेशनच्या महिला उपाध्यक्षापदी शबनम सय्यद यांची निवड

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड शहरातील ज्येष्ठ नेते आझम पानसरे यांच्या वाढदिवसानिमित्त शहरातील सामाजिक संस्थेच्यावतीने आझम पानसरे सोशल फाऊंडेशनच्या वतीने साजरा करण्यात आला.

या वाढदिवसाचे औचित्य साधून आझम पानसरे सोशल फाऊंडेशनच्या महिला उपाध्यक्षापदी सामाजिक कार्यकर्त्या आणि पत्रकार शबनम सय्यद यांची निवड करण्यात आली. त्यांना ज्येष्ठ नेते आझम पानसरे यांनी निवडपत्र दिले.

यावेळी सामाजिक युवानेते अनुप मोरे, संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष अकबर मुल्ला, उपाध्यक्ष प्रतिक लोंढे, सचिव साहूल हमीद शेख, जब्बार शेख, सल्लागार चंद्रकांत शिंदे आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.