Pimpri : शहराचे विद्रुपीकरण करणारे होर्डिंग काढा – श्रीरंग बारणे

एमपीसी न्यूज  – पिंपरी-चिंचवड शहरात यापुढे (Pimpri) एकही अनधिकृत होर्डिंग उभारु देऊ नका, सर्व होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करावे. शहराचे विद्रुपीकरण करणारे होर्डिंग तत्काळ काढावेत. त्यांची परवानगी रद्द करावी. आकाश चिन्ह व परवाना विभागात मोठा भ्रष्टाचार, गैरप्रकार होत आहे. या विभागात वर्षानुवर्षे काम करणारे अधिकारी, कर्मचा-यांची दुस-या विभागात बदली करावी, अशी सूचना शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी महापालिका आयुक्तांना केली.

किवळेतील दुर्देवी घटनेनंतर खासदार श्रीरंग बारणे यांनी शहरातील अनधिकृत होर्डिंग संदर्भात आयुक्त शेखर सिंह यांच्यासोबत बैठक घेतली. 433 अनधिकृत होर्डिंगबाबत तत्काळ सुनावणी घेण्याची न्यायालयाला विनंती करावी. या व्यतिरिक्त 72 नव्याने अनधिकृत होर्डिंग आढळून आले आहेत.

त्या होर्डिंगवर तात्काळ कारवाई करावी. काही जाहिरात व्यावसायिकांनी परवानगीपेक्षा मोठ्या आकाराचे होर्डिंग उभारले आहेत. शहरातील सर्व होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करावे. परवानगीपेक्षा मोठा होर्डिंग उभारणा-यांवर कारवाई करावी.

Maharashtra : डॉ.आप्पासाहेब धर्माधिकारी बदनामी प्रकरणी एकाला पुण्यातून अटक

होर्डिंगला परवनागी देताना शहराचे विद्रुपीकरण होणार नाही (Pimpri) याची खबरदारी घ्यावी. परवानगी देण्यासाठी नवीन प्रणाली आणावी. आकाश चिन्ह व परवाना विभागात मोठा भ्रष्टाचार, गैरप्रकार होत आहे. या विभागात वर्षानुवर्षे काम करणारे अधिकारी, कर्मचा-यांची दुस-या विभागात तत्काळ बदली करावी.

या विभागाचा आयुक्तांनी दर तीन महिन्यांनी आढावा घ्यावा. शहराचे विद्रुपीकरण करणारे होर्डिंग काढावेत. त्यांची परवानगी रद्द करावी. विद्रुपीकरण होईल अशा ठिकाणी होर्डिंग उभारण्यास परवानगी देऊ नये. केवळ व्यवसाय म्हणून या विभागाकडे पाहू नये. आवश्यक ठिकाणीच होर्डिंग उभारण्यास नियमाप्रमाणे परवानगी द्यावी, अशी सूचनाही खासदार बारणे यांनी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.