Pimpri : लिफ्टमध्ये अडकलेल्या सात जणांची सुटका

एमपीसी न्यूज – सोसायटीच्या लिफ्टमध्ये अडकलेल्या सात जणांची ( Pimpri ) अग्निशमन दलाच्या जवानांनी लिफ्ट कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या साहाय्याने सुखरूप सुटका केली. ही घटना शनिवारी (दि. 16) रात्री सव्वा नऊ वाजताच्या सुमारास रॉयल रेसिडेन्सी, मोरवाडी पिंपरी येथे घडली.
 
फयाज (वय 10, रा. कुदळवाडी), अंबादास हांडे (वय 62, रा. जुन्नर), वसंत सातपुते (वय 57, रा. संगमनेर), महादेव सातपुते (वय 60, रा. पुणे), सोन्या सातपुते (वय 57, रा. संगमनेर), जगन्नाथ सातपुते(वय 54, रा. संगमनेर), दिलीप भालके (वय 57, रा. मोशी) अशी सुटका केलेल्या व्यक्तींची नावे आहेत.

Manoj Jarange Patil : अशोक चव्हाण यांनी मनोज जरांगे पाटील यांची घेतली भेट

 
अग्निशमन दलाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री सव्वानऊ वाजता अग्निशमन विभागाला हणमंत गुब्याड यांनी माहिती दिली की, रॉयल रेसिडेन्सी, मोरवाडी पिंपरी येथे लिफ्ट मध्ये काही लोक अडकले आहेत. त्यानुसार अग्निशमन दलाचे विठ्ठल सफकाळ, अमोल चिपळूणकर, चंद्रकांत चव्हाण, विकास कुटे, महेश इंदलकर, दिपेश दिवेकर, योगेश ढोले हे घटनास्थळी दाखल झाले.
 
लिफ्ट तिसऱ्या मजल्यावर अचानक बंद पडल्याने लिफ्ट मध्ये सातजण अडकले होते. अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ लिफ्ट कंपनीच्या प्रतिनिधींना पाचारण केले. त्यांच्या मदतीने अर्ध्या तासात लिफ्ट उघडून सात जणांना सुखरूप बाहेर ( Pimpri ) काढण्यात आले.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.