Pimpri : रेल्वेच्या धडकेत वृद्धाचा मृत्यू

एमपीसी न्यूज – भरधाव रेल्वेने उडवल्याने एका 55 वर्षीय इसमाचा मृत्यू झाला. कासारवाडी रेल्वे स्थानकाजवळ रविवारी (दि.17) रात्री आठच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. मृताची ओळख पटविण्याचे काम पिंपरी रेल्वे पोलिसांकडून सुरु आहे.

रविवारी रात्री कासारवाडी रेल्वे स्थानकाजवळ पादचारी पुलाखाली लोहमार्गावर मृतदेह असल्याची माहिती पिंपरी पोलिसांना मिळाली. मृताचे वय अंदाजे 55 वर्षे असून रंग काळा, उंची 5 फूट 5 इंच, चेहरा उभा, बारीक पांढरी दाढी, केस काळे वाढलेले, बांधा सडपातळ असे वर्णन आहे. तसेच काळ्या रंगाचा पांढऱ्या पट्ट्यांची नक्षी असलेला फुल बाह्यांचा शर्ट व काळी पॅन्ट असे कपडे परिधान केले होते. मृताचा चेहरा विद्रुप झाला असून कोणतेही कागदपत्रे त्याच्याजवळ न सापडल्याने ओळख पटू शकली नाही. या वर्णनाच्या व्यक्तीबाबत कोणत्याही स्वरूपाची माहिती असल्यास चिंचवड लोहमार्ग पोलिसांशी संपर्क करावे असे आवाहन करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.