Pune : चंदननगर येथील महिलेवर गोळीबार करणारे दोघेही सुपारी किलर बापलेक

एमपीसी न्यूज – चंदननगर येथील आनंदनगर पार्कमधील एका घरात घुसून महिलेवर गोळीबार करून तिला ठार मारणारे दोघे हे सुपारी किलर असल्याची माहिती तपासात पुढे आली आहे. दोघेही बापलेक असून महिलेला मारण्याची सुपारी त्यांना नेमकी कोणी आणि का दिली याचा तपास पोलीस करत आहेत. याच सुपारी किलर्सनी पोलीस निरीक्षक गजानन पवार यांच्यावर पुणे रेल्वे स्थानकात गोळीबार केला होता. बुधवारी(दि.21) रोजी हा सर्व प्रकार घडला होता.

शिवाजी बाबूलाल राव (वय 39, रा.उत्तमनगर) व त्याचा मुलगा मुकेश शिवलाल राव (वय 19, रा.उत्तमनगर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चंदननगर येथील आनंदनगर पार्कमध्ये राहणाऱ्या एकता ब्रिजेश भाटी या महिलेवर गोळीबार करून आरोपी पसार झाले होते. या गुन्ह्याचा तपास करताना संबंधित आरोपी झेलम एक्सप्रेसने दिल्लीला जाणार असल्याची माहिती मिळाली. बुधवारी संध्याकाळी त्यांना पकडण्यासाठी पोलीस पथकासोबत गेलेल्या पोलीस निरीक्षक गजानन पवार यांच्यावर त्या आरोपीनी गोळीबार केला होता. यामध्ये गजानन पवार गंभीर जखमी झाले होते.

परंतु, पोलिसांनी शिताफीने दोघांना ताब्यात घेऊन अटक केली. आरोपीना न्यायालयात हजर केले असता त्यांना 30 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.चौकशी दरम्यान शिवलाल आणि मुकेश हे दोघे बापलेक असल्याचे समोर आले. परंतु महिलेला मारण्याची सुपारी नेमकी कोणी आणि का दिली याचा तपास पोलीस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.