Pimpri : अजित पवार गटाला धक्का, आझम पानसरे यांचा शरद पवार गटाला पाठिंबा

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील ज्येष्ठ(Pimpri) नेते आझम पानसरे यांनी शरद पवार यांची पुणे येथे भेट घेतली. या भेटीत त्यांनी शरद पवार यांना पाठींबा जाहीर केला आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट अजित पवार गटाला धक्का मानली जात आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष शरद पवार गटाची शहर अध्यक्ष पदाची जबाबदारी तुषार कामठे यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. कामठे यांनी पक्षवाढीसाठी हालचाली सुरु केल्या आहेत. आझम पानसरे यांना मानणारा मोठा वर्ग शहरात आहे. मागील काही दिवस तुषार कामठे यांची टीम पानसरे यांच्या सतत संपर्कात होती.

Pimpri : महापालिकेने चार दिवसांत केल्या 68 मालमत्ता जप्त

काही दिवसांपूर्वी आमदार रोहित पवार यांनी तुषार कामठे (Pimpri)आणि रविकांत वरपे यांच्या समवेत आझम पानसरे यांच्या घरी राजकारणाची खलबतं सुरु केली होती. तुषार कामठे यांच्यासह सुलक्षणा शिलवंत, गणेश भोंडवे, शिरीष जाधव, काशिनाथ जगताप, मुख्य प्रवक्ते माधव पाटील, राजन नायर, देवेंद्र तायडे, प्रशांत सपकाळ आदींनी वेळोवेळी चर्चा केल्या.

 

आझम पानसरे म्हणाले, “शरद पवार साहेबांच्या काही धोरणी निर्णयाने पिंपरी चिंचवड शहर मिनी इंडिया म्हणून ओळखले जाते. यामुळेच मी साहेबांसोबत आलो आहे. तुषार कामठे यांच्या नेतृत्वात आगामी पालिका निवडणुकीत सत्ता मिळवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.”

आझम पानसरे यांचा शरद पवार गटाला पाठिंब्याचा निर्णय अजित पवार गट आणि भाजपची चिंता वाढवणारा ठरू शकेल का, हे पाहणे औत्सुक्यचे आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.