Pune : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सोशल मीडियावरून अश्लील भाषेत शिवीगाळ केल्याप्रकरणी पुण्यात एकावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज -पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सोशल मीडियावरून( Pune ) अश्लील भाषेत शिवीगाळ केल्याप्रकरणी तसेच हिंदू देव-देवतांच्याबाबत अश्लील आणि अर्वाच्य भाष्य वापरल्याप्रकरणी पुण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यातील लोणीकंद पोलीस ठाण्यात 31 वर्षीय तरुणाच्या विरोधात ही कारवाई कारण्यात आली आहे.

रवींद्र पडवळ यांनी याप्रकरणी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून  सागर सावंत असे गुन्हा दाखल केलेल्या आरोपीचे नाव आहे.

Kondhwa : वाहनाच्या धडकेत श्वानाचा मृत्यू

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी यांचा बुदमध्ये राहणारा मित्र सुजित खेडकर याच्या  इनस्टाग्रामवर  शेअर केलेल्या पोस्टला उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच हिंदू देव-देवतांच्या विषयी खालच्या पातळीची आणि अश्लील भाषा वापरली. धार्मिक भावना दुखावल्या म्हणून आरोपीवर गुन्हा ( Pune ) दाखल करण्यात आला आहे.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.