Pimpri :तर भारत हिंदूराष्ट्र झाल्याशिवाय राहणार नाही- मिलिंद एकबोटे

एमपीसी न्यूज – आज आपला भारत देश जगात (Pimpri )जगदगुरू होण्याच्या दिशेने मार्गक्रमण करीत आहे.स्वामी विवेकानंद यांच्या स्वप्नांची परिपूर्ती होत आहे. स्वामींजींचे स्मरण संपूर्ण देशात व्हायला हवेत.

स्वामीजींच्या विचारांचा जागर झाल्यास भारत हिंदूराष्ट्र निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही.असा विश्वास समस्त हिंदू आघाडीचे कार्याध्यक्ष मिलिंद एकबोटे यांनी व्यक्त केला.

Pimpri : महापालिकेची तीन मिनिटांच्या चित्रफितीसाठी पावणेसात लाखांची उधळपट्टी

शरद नगर चिखली येथील स्वामी विवेकानंद लोकसेवा प्रतिष्ठानच्या वतीने(Pimpri ) एकबोटे यांना जीवनगौरव पुरस्कार, स्नेहवनचे संचालक अशोक देशमाने यांना स्वामी विवेकानंद युवा पुरस्कार , सुधीर धर्माधिकारी यांना भक्त पुंडलिक पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी ते पुरस्काराला उत्तर देताना ते बोलत होते. यावेळी कामगार नेते सचिन लांडगे,सुनील लोखंडे, भंडारा डोंगर ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब काशीद, उपनिबंधक नितीन काळे, अजय पाताडे, सचिन सानप,विष्णू नेवाळे, अध्यक्ष रामराजे बेंबडे, उपाध्यक्ष संतोष ठाकूर आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी काशीद म्हणाले की, हिंदूत्व हा संत विचार आहे.”खरा तो एकचि धर्म जगाला प्रेम अर्पावे” हा साने गुरुजींचा संदेश आज रुजविण्याची गरज आहे. टाटा मोटर्स युनियन अध्यक्ष सचिन लांडगे म्हणाले की, स्वामी विवेकानंद यांनी समाजाला ऊर्जा देण्याचे कार्य केले.

 

स्वामींचा आदर्श घेवून पुरस्कारप्राप्तीकडून हेच कार्य होत आहे. हा आदर्श इतरांनी घेतला पाहिजे. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुनील पंडित, मिलिंद वेल्हाळ, महेश मांडवकर, शंकरराव बनकर, पंढरीनाथ म्हस्के, सुनील पंडीत ,पंढरीनाथ म्हस्के, दिलीप मांडवकर,अशोक हाडके यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महादेव कवितके यांनी तर आभार संतोष ठाकूर यांनी केले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.