Pimpri : भरधाव दुचाकीची आयसर टेम्पोला धडक; दुचाकीस्वाराचा मृत्यू

एमपीसी न्यूज – भरधाव जाणाऱ्या दुचाकीने एका आयसर (Pimpri)टेम्पोला पाठीमागून धडक दिली. त्यामध्ये दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (दि. 24) रात्री दहा वाजताच्या सुमारास काळेवाडी ते ऑटो क्लस्टर दरम्यान असलेल्या मदर टेरेसा उड्डाण पुलावर घडली.

अक्षय पांचाळ असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वराचे नाव आहे. याप्रकरणी सतीश बाबुराव भिडे (वय 49, रा. मोशी) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Alandi : आळंदीतील श्री दुर्गामाता महादौड ची शितला देवीच्या आरतीने सांगता

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे(Pimpri)त्यांच्या ताब्यातील आयसर टेम्पो (एमएच 14/जीयु 8062) काळेवाडी येथून ऑटो क्लस्टरच्या दिशेने चालवीत घेऊन जात होते. उड्डाणपुलावरील बीआरटी बस थांब्याजवळ आल्यानंतर फिर्यादी यांच्या टेम्पोला अक्षय पांचाळ याने त्याच्या ताब्यातील दुचाकीने (एमएच 14/जीबी 9418) पाठीमागून जोरात धडक दिली.

त्यात दुचाकीस्वार खाली पडला आणि त्यातच जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला. यामध्ये फिर्यादी यांच्या टेम्पोचे नुकसान झाले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.