Alandi : आळंदीतील श्री दुर्गामाता महादौड ची शितला देवीच्या आरतीने सांगता

एमपीसी न्यूज : नवरात्र उत्सवाच्या पहिल्या माळेपासून(Alandi) सुरुवात करण्यात आलेली श्री दुर्गा माता दौड मिरवणूक आळंदी आणि पंचक्रोशीत तरुणाईचे आकर्षक ठरले होते. या सोहळ्यात तरुणाईने मोठा सहभाग नोंदवला.छत्रपती शिवाजी महाराजआणि छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास महाराष्ट्रातील प्रत्येक घरोघरी पोहचावा यासाठी १९८२ साली भिडे गुरुजींच्या अध्यक्षतेखाली श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानची स्थापना करण्या आली.

या प्रतिष्ठानच्या माध्यमातून गेल्या काही वर्षांपासून (Alandi)आळंदी सह केळगाव,चऱ्होली खुर्द,केळगाव,धानोरे,वडगाव घेनंद,कोयाळी सह संपूर्ण खेड तालुक्यात श्री दुर्गा माता दौड चे आयोजन नवरात्र उत्सवातील विजयादशमीच्या दिवशी करण्यात येते. नवरात्र उत्सवातील नऊ दिवस आळंदी येथील एका मंदिरातून दुसऱ्या मंदिरात ही दुर्गा माता दौड आयोजन केले जाते.

Chikhali : उघड्यावर जैव वैद्यकीय घनकचरा टाकणाऱ्या वैद्यकीय व्यावसायिकांकडून 70 हजारांचा दंड वसूल

तर विजया दशमीच्या मुहूर्तावर महादौड सांगता करण्यात येत असते.यावेळी विजया दशमी च्या निमित्त आळंदी पोलीस स्टेशन वरीष्ठ पोलीस निरीक्षक सुनील गोडसे यांच्या हस्ते ग्रामदैवत श्री खंडोबा येथील आरती करण्यात आली.

या दौड मध्ये सहभागी धारकरी,वारकरी आणि ग्रामस्थ पारंपरिक वेशभूषा धारण करून, मिरवणुकीत सहभागी झाले होते. तसेच राष्ट्रवीर मर्दानी खेळाचे आयोजन करण्यात आले होते.
नवरात्री मधील घटस्थापनेच्या मुहूर्तावर प्रत्येक वर्षी सुरुवात करण्यात आलेली श्री दुर्गा माता महादौड दहाव्या दिवशी विजया दशमीच्या मुहूर्तावर शीतला देवीच्या मंदिरात देवीच्या आरतीने सांगता करण्यात आली. प्रत्येक दिवशी आळंदी येथील एका मंदिरातून दुसऱ्या मंदिरात ही दुर्गा माता दौडचे आयोजन करण्यात येत असते. तर दसऱ्याच्या मुहूर्तावर या महादौडची सांगता करण्यात आली. या महादौड मध्ये प्रत्येकवर्षी तरुणाईचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. याबाबत माहिती श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संस्थेने दिली.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.