Chikhali : उघड्यावर जैव वैद्यकीय घनकचरा टाकणाऱ्या वैद्यकीय व्यावसायिकांकडून 70 हजारांचा दंड वसूल

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या क क्षेत्रिय आरोग्य विभागाच्या वतीने मोशी येथील रिव्हर रेसिडेन्सी ते (Chikhali) कोलोशीस रोडवर उघड्यावर जैव वैद्यकीय घनकचरा टाकल्याबद्दल दोन वैद्यकीय व्यावसायिकांकडून 70000 रुपयाचा तर डेंग्यू अळ्या आढळल्याबद्दल एका व्यवसायिकाकडून दहा हजार रुपयांचा दंड असा 80 हजार रुपयांचा दंड आज करण्यात आला.

ही कारवाई आज सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे यांच्या नेतृत्वाखाली सहायक आरोग्य अधिकारी तानाजी दाते, आरोग्य निरीक्षक वैभव घोळवे आणि अमर सूर्यवंशी यांच्या पथकाने चिखली मोशी परिसरात केली.

पिंपरी-चिंचवड शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी सर्व नागरिकांचे सहकार्य अपेक्षित असून रस्त्यावर कचरा टाकू नये असे (Chikhali) आवाहन आयुक्त शेखर सिंह यांनी केले आहे

Pimpri : रस्त्यावर झाड पडल्याने वाहतुकीचा खोळंबा

मंगलम क्लिनिक चिखली व श्री समर्थ क्लिनिक मोशी या दोन्ही वैद्यकीय व्यावसायिकाला प्रत्येकी 35 हजार रुपयांच्या दंड आकारण्यात आला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.