Pimpri : भरधाव ट्रकची दुचाकीला धडक; दोघांचा मृत्यू

एमपीसी न्यूज – भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिली. या (Pimpri) अपघातात दुचाकीवरील दोघांचा मृत्यू झाला. हा अपघात बुधवारी (दि. 20) रात्री साडेदहाच्या सुमारास पुणे-मुंबई महामार्गावर चिंचवड येथे बिग बाजार समोर झाला.

छत्राराम रामजी चौधरी (वय 45, रा. रावेत), आछलाराम दर्गाजी चौधरी (वय 50, रा. चिंचवडगाव) अशी मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत.

पोलीस अंमलदार संदीप शेळके यांनी याप्रकरणी गुरुवारी (दि. 21) पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार ट्रक चालक रामेश्वर तुळशीराम जाधव (वय 23, रा. शिंदेगाव, ता. सिन्नर, जि. नाशिक, मूळगाव कारली, जि. वाशिम) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आछलाराम हे एलआयसी एजंट होते. छत्राराम हे सौंदर्य प्रसाधनांचे ठोक विक्रेते होते. दोघेही एका दुचाकीवरून पुणे येथून चिंचवड येथे जात होते.

त्यावेळी चालक रामेश्वर जाधव याच्या ताब्यातील ट्रकने आछलाराम (Pimpri) आणि छत्राराम यांच्या दुचाकीला धडक दिली. यात दोघेही दुचाकीवरून खाली पडले. त्यानंतर ट्रकचे चाक दोघांच्या डोक्यावरून जाऊन ते चिरडले गेले.

अपघाताबाबत माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. आछलाराम आणि छत्राराम या दोघांनाही पिंपरी येथील वायसीएम रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच दोघांचा मृत्यू झाल्याचे डाॅक्टरांनी जाहीर केले. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

Today’s Horoscope 22 September 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.