Pimpri : नेहरुनगर येथे ‘खेळ रंगला पैठणीचा’ ला उत्स्फूर्त प्रतिसाद

एमपीसी न्यूज – भोसरी विधानसभेचे आमदार महेश लांडगे यांच्या (Pimpri) वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक, अध्यात्मिक, क्रीडा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. नेहरुनगर येथे आयोजित ‘खेळ रंगला पैठणीचा’ कार्यक्रमाला परिसरातील महिला-नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

पिंपरी-चिंचवड भाजपा अल्पसंख्यांक मोर्चाचे माजी शहराध्यक्ष फारुक इनामदार यांच्या वतीने सिने कलाकार क्रांतीनाना मळेगावकर प्रस्तुत ‘खेळ रंगला पैठणी’चा या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला आमदार महेश लांडगे यांनी उपस्थिती लावली.  यावेळी भाजपाचे सरचिटणीस अजय पाताडे, सरचिटणीस संजय मंगोडेकर, माजी नगरसेविका मंदाकिनी ठाकरे, माजी स्वीकृत नगरसेविका वैशाली खाडे, माजी शिक्षण मंडळ सभापती अर्जुन ठाकरे, निगडी चिखली मंडलाध्यक्ष महादेव कवीतके आदी उपस्थित होते.  क्रांती युथ मंडळ ट्रस्ट सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी आयोजन केले.

विविध भेटवस्तुंची उधळण…
कार्यक्रमात सहभागी झालेल्या प्रत्येक महिलेला आकर्षक भेटवस्तू देण्यात आली व विजेत्या महिलांना पैठण्या व अनुक्रमे पारितोषिके सिमा उकीर्डे – प्रथम क्रमांक – टेलिव्हिजन सेट ( Tv ),शक्ती निंबर्गी – द्वितीय क्रमांक – रेफ्रीजिरेटर ( फ्रीज ), कविता विजय पाटील – तृतीय क्रमांक – वॉशिंग मशीन, अश्विनी राहूल कापरे – चतुर्थ क्रमांक – इलेक्ट्रॉनिक स्टोव्ह,शारदा कदम – पाचवा क्रमांक – मिक्सर ग्रॅंडर अशा पद्धतीने पारितोषिक वितरण करण्यात  (Pimpri)  आले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.