Vadgaon : कै. गोपाळराव देशपांडे वनवासी विद्यार्थी वसतिगृहाला धान्याची मदत

एमपीसी न्यूज – कै. गोपाळराव देशपांडे वनवासी विद्यार्थी वसतिगृहाला धान्याची (Vadgaon)मदत मिळाली. हा उपक्रम अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांच्या वाढदिवसानिमित्त कलादर्पण संस्थेच्या वतीने राबविण्यात आला.
कलादर्पण संस्थेच्या वतीने विद्यार्थ्यांना धान्यवाटप करण्यात (Vadgaon)आले. यावेळी कलादर्पण संस्थेचे प्रमुख व अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे सभासद तुषार वहिले व निवृत्त भारतीय सेना अधिकारी उदयसिंग परदेशी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
विद्यार्थ्यांना कला क्षेत्र व चित्रपट महामंडळा विषयी माहिती देण्यात आली. यावेळी नितीन जाधव, वसतिगृह अधीक्षक सोमनाथ वैद्य व प्रजित पवार उपस्थित होते.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.