Vadgaon Maval : जिल्हा पातळीवर राजकीय विरोध पण गावच्या कारभारात दिलजमाई

एमपीसी न्यूज – आढले बुद्रुक गावची ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध (Vadgaon Maval)झाली. त्यानंतर उपसरपंच पदाची निवड देखील बिनविरोध झाली. ही किमया पु णे जिल्हा राष्ट्रवादी (अजित पवार गट) युवकचे जिल्हाध्यक्ष सचिन घोटकुले, पुणे जिल्हा भाजपचे कार्याध्यक्ष बाळासाहेब घोटकुले, गोदामचे संस्थापक नितीन घोटकुले या पदाधिकाऱ्यांनी साधली आहे.

आजवर दोन्ही पक्षांचा एकमेकांना विरोध होता. मात्र अजित पवार यांचा गट भाजपसोबत सत्तेत गेल्याने गाव पातळीवर देखील दिलजमाई झालेली पहायला मिळते. त्यामुळे राजकारणात एकमेकांशी संघर्ष करणाऱ्या आढले बुद्रुक मधील या दोन पदाधिकाऱ्यांनी गावात मात्र एकत्र येऊन गावचा एकोपा राखण्याचे काम केल्याने त्यांचे कौतुक होत आहे.

Pimpri : चार्जिंग स्टेशनसाठी पुन्हा फेरनिविदा, ‘या’ 22 ठिकाणी उभारणार स्टेशन

यावेळी ग्रामपंचायत सदस्य नितीन साळुंखे, (Vadgaon Maval)जयश्री घोटकुले, संतोष कदम, तानाजी घोटकुले, वंदना घोटकुले मच्छिंद्र म्हस्के, प्रियंका घोटकुले, अश्विनी वाघमारे उपस्थित होते. नायब तहसीलदार अमोल पाटील यांच्या मार्गर्शनाखाली तलाठी सचिन जाधव, ग्रामसेवक सुनीता चौधरी यांनी कामकाज पाहिले.

सचिन घोटकुले व बाळासाहेब घोटकुले हे दोघेही दोन प्रमुख पक्षांचे प्रमुख पदाधिकारी असल्याने त्यांच्यामध्ये मोठा राजकीय संघर्ष असून आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांना एकमेकांचे स्पर्धक म्हणून ओळखले जाते. परंतु गावच्या हितासाठी या दोन पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निवडणुक पूर्ण बिनविरोध करून नवा आदर्श समाजापुढे ठेवला.

आज सरपंच सुवर्णा घोटकुले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष सभेत उपसरपंच पदासाठी घेण्यात आलेल्या निवडणुक प्रक्रियेत सर्वानुमते पल्लवी संतोष वाघमारे यांचा एकमेव अर्ज दाखल करण्यात आला व उपसरपंच पदाचीही निवडणुक बिनविरोध करण्यात आली.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.