Pimpri : पिंपरीत सुद्धा सोशल डिस्टन्सिंगचा ‘तळेगाव पॅटर्न’

0

एमपीसी न्यूज – भाजीपाला, किराणा व इतर जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी लाॅकडाऊनमधून मुभा देण्यात आली आहे, तरीही लोक सूरक्षेची काळजी न घेता खरेदीसाठी गर्दी करत आहेत. यावर तोडगा काढण्यासाठी तळेगाव दाभाडे येथे भाजी व किराणा खरेदी साठी 1 मीटर अंतरावर रंगाने आखून दिलेल्या जागेत लोकांना रांगेत उभे राहण्याची सोय करण्यात आली होती. याचेच अनुकरण करत आता पिंपरीतसुद्धा सोशल डिस्टन्सिंगचा तळेगाव पॅटर्न वापरला जात आहे.

सर्व जग कोरोनाशी दोन हात करत लढा देत आहेत. या गंभीर परिस्थितीत लोकांना कोरोनाशी कसे लढायचे या साठी जनजागृती करणे महत्वाचे आहे. सुरक्षेची खबरदारी न घेता नागरिक मोठ्या प्रमाणावर गर्दी करताना दिसत आहेत. यावर उपाय म्हणून पुण्यश्लोक श्री राजा शिवछत्रपती प्रतिष्ठान व धर्मरक्षा समिती खराळळवाडी यांच्या माध्यमातून किराणा दुकान, डेअरी, दवाखाना ,मेडिकल, महापालिका आरोग्य केंद्र यांच्या समोर 1 मीटर अंतरावर रखाने आखून दिलेल्या जागेत लोकांना रांगेत उभे राहण्याची सोय करण्यात आली आहे.

कोरोनाशी मुकाबला करण्यासाठी ‘सोशल डिस्टन्सिंग’चे पालन लोकांनी करायला हवे तसेच शक्य तेवढी अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे.

HB_POST_END_FTR-A2
You might also like