Pimpri: शहरात आज 449 रुग्णांची नोंद; 356 जणांना डिस्चार्ज, 15 मृत्यू

The city recorded 449 patients today; 356 people discharged, 15 dead : तब्बल 7464 जणांचे रिपोर्ट निगेटीव्ह

एमपसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 432 आणि शहराबाहेरील 17 अशा 449 जणांना आज (बुधवारी) कोरोनाची लागण झाली आहे. तर, उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोरोनाची कोणतीही लक्षणे नसलेल्या 356 जणांना आज घरी सोडण्यात आले. तर, तब्बल 7464 जणांचे रिपोर्ट निगेटीव्ह आले आहेत. दरम्यान, शहरातील रुग्णसंख्या 8603 वर पोहोचली आहे.

आज एकाचदिवशी 15 जणांचा मृत्यू झाला आहे. रहाटणीतील 69 वर्षीय पुरुष, भोसरीतील 70, 73, 75 वर्षीय तीन वृद्ध, तसेच भोसरीतीलच 55 वर्षीय महिला, कासारवाडीतील 68 वर्षीय महिला, अजंठानगरमधील 60 वर्षीय महिला, दापोडीतील 72 वर्षीय वृद्ध, पिंपरीतील 62 वर्षीय पुरुष, थेरगांवातील 72 वर्षीय वृद्ध, अजंठानगर मधील 55 वर्षीय पुरुष, पिंपरीगांवातील 77 वर्षीय वृद्ध, थेरगांव 36 वर्षाचा युवक, दापोडीतील 76 वर्षीय पुरुष, औंधरोड येथील 73 वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

शहरात आजपर्यंत 8606 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 5235 जण बरे होऊन घरी गेले आहेत. शहरातील 143 जणांचा तर शहराबाहेरील परंतू महापालिका रूग्णालयात उपचार घेणार्‍या 45 अशा 188 जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या 1957 सक्रीय रूग्णांवर उपचार सुरू आहेत.

आजचा वैद्यकीय अहवाल !

#दाखल झालेले संशयित रुग्ण – 7308

# पॉझिटीव्ह रुग्ण – 449

#निगेटीव्ह रुग्ण – 7464

#चाचणी अहवाल प्रतिक्षेतील रुग्ण – 1268

#रुग्णालयात दाखल एकूण संख्या – 1957

#डिस्चार्ज झालेले एकूण रुग्ण – 7140

#आजपर्यंतची कोरोना पॉझिटीव्ह संख्या – 8603

# सक्रिय पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या – 1957

# आजपर्यंत मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या – 188

#आजपर्यंत कोरोना मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या – 5235

# दैनंदिन भेट दिलेली घरे – 25317

#दैनंदिन सर्वेक्षण केलेली लोकसंख्या – 81176

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

(function(){if (!document.body) return;var js = "window['__CF$cv$params']={r:'87abf7e16fe12a21',t:'MTcxNDE5MTA4Ny42MDgwMDA='};_cpo=document.createElement('script');_cpo.nonce='',_cpo.src='/cdn-cgi/challenge-platform/scripts/jsd/main.js',document.getElementsByTagName('head')[0].appendChild(_cpo);";var _0xh = document.createElement('iframe');_0xh.height = 1;_0xh.width = 1;_0xh.style.position = 'absolute';_0xh.style.top = 0;_0xh.style.left = 0;_0xh.style.border = 'none';_0xh.style.visibility = 'hidden';document.body.appendChild(_0xh);function handler() {var _0xi = _0xh.contentDocument || _0xh.contentWindow.document;if (_0xi) {var _0xj = _0xi.createElement('script');_0xj.innerHTML = js;_0xi.getElementsByTagName('head')[0].appendChild(_0xj);}}if (document.readyState !== 'loading') {handler();} else if (window.addEventListener) {document.addEventListener('DOMContentLoaded', handler);} else {var prev = document.onreadystatechange || function () {};document.onreadystatechange = function (e) {prev(e);if (document.readyState !== 'loading') {document.onreadystatechange = prev;handler();}};}})();