Pune: व्हेंटिलेटर न मिळाल्यामुळे निवृत्त शास्त्रज्ञाचा मृत्यू

Pune: Retired scientist dies due to lack of ventilator पुण्यात वैद्यकीय उपचारामध्ये दिरंगाई

एमपीसी न्यूज – पुण्यातील आरोग्य व्यवस्थेचा कसा बोजवारा उडाला याचा आणखी एक उदाहरण समोर आलंय. एका निवृत्त शास्त्रज्ञाला उपचारासाठीची दिरंगाई आणि व्हेंटिलेटरचा अभाव यामुळे प्राण गमवावे लागले आहेत. डॉ. पी. लक्ष्मी नरसिंह असे मृत्युमुखी पडलेल्या शास्त्रज्ञाचे नाव आहे. बोटनिकल सर्वे इंडिया तून ते मागील वर्षी निवृत्त झाले होते. बुधवारी पहाटेच्या सुमारास ससून रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाला.

पुणे शहर काँग्रेसचे सरचिटणीस व प्रवक्ते रमेश अय्यर यांनी या प्रकरणी माहिती देताना सांगितले कि, मंगळवारी सायंकाळी डॉक्टर नरसिंहन यांना श्वास घेण्यासाठी त्रास जाणवू लागल्यामुळे नगर रस्त्यावरील एका खाजगी रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले होते. रुग्णालयातील डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर व्हेंटिलेटर नसल्याचे सांगत त्यांना दुसऱ्या रूग्णालयात हलविण्यास सांगितले.
दरम्यान नरसिंहन यांची प्रकृती जास्त खालावल्याने मुळे त्यांच्या कुटुंबीयांनी फोनवर माझ्याशी संपर्क साधला. त्यानंतर मी विभागीय आयुक्त कार्यालयाने सुचविल्याप्रमाणे संकेतस्थळावर व्हेंटिलेटर बेड कुठे उपलब्ध आहेत का याची माहिती सर्च केली.

मिळालेल्या माहितीनंतर काही रूग्णालयात फोन करून चौकशी केली परंतु त्यांनीही बेड उपलब्ध नसल्याचे सांगितले. त्यानंतर अधिक प्रकृती खालावत चालल्यामुळे नरसिंहन त्यांना ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले.
ससून रुग्णालयात डॉक्टर नरसिंहन  यांना दाखल करून घेतल्यानंतर तेथील डॉक्टरांनी व्हेंटिलेटर बेड साठी आधीच तीन रुग्ण प्रतीक्षा यादीत असल्याचे सांगितले. त्यामुळे त्यांना ऑक्सीजन वर ठेवण्यात आले होते. अखेरीस बुधवारी पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास डॉक्टर नरसिंहन यांची प्राणज्योत मालवली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.