Maharashtra Corona Update: दिवसभरात 7,975 नवे रुग्ण, 233 मृत्यू

Maharashtra Corona Update: 7,975 new patients, 233 deaths in a day कोरोनामुक्त रुग्णांचे प्रमाण 55.37 टक्के, राज्यातील मृत्यूदर 3.96 टक्क्यांपर्यंत खाली

एमपीसी न्यूज – राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. आज (बुधवारी) दिवसभरात राज्यात 7,975 नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 2 लाख 75 हजार 640 इतकी झाली आहे.

राज्याच्या आरोग्य खात्याने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, आज एका दिवसांत राज्यात 233 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर राज्यात आतापर्यंत एकूण 10 हजार 928 जण दगावले आहेत. सध्या राज्यातील मृत्यूदर 3.96 टक्के इतका आहे.

दिलासादायक बाब म्हणजे राज्यात कोरोना रुग्ण वाढत असताना, कोरोना रुग्ण बरे होण्याची संख्याही वाढत असल्याची दिसत आहे. आज राज्यात 3606 रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत राज्यात एकूण 1 लाख 52 हजार 613 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना घरी सोडण्यात आलं आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण-रिकव्हरी रेट 55.37 टक्के इतका आहे.सध्या राज्यात 1 लाख 11 हजार 801 ऍक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

राज्यात 7,08,373 जण होम क्वारंटाईनमध्ये असून 43,315 जण संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

दरम्यान, मुंबईत आज 1390 कोरोना रुग्ण  सापडले आहेत तर 62 जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईमधील एकूण बाधितांची संख्या 96,253 एवढी झाली आहे पैकी 67,830 जण कोरोना मुक्त झाले आहेत तर  22,959 सक्रिय रुग्ण आहेत. मुंबई मध्ये आजवर 5,464 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.