BNR-HDR-TOP-Mobile

Pimpri : करोना व्हायरस आता “कोविड 19” म्हणून ओळखला जाणार

0

एमपीसी न्यूज – जागतिक आरोग्य संघटनेने करोना विषाणूला नवीन नाव दिले आहे. करोना विषाणूला आता “कोविड 19” असे अधिकृत नाव जागतिक आरोग्य संघटनेने दिले आहे. हा विषाणू डिसेंबर 2019 रोजी चीनमध्ये पहिल्यांदा आढळून आला होता.

जागतिक आरोग्य संघटनेने करोना विषाणूला आता “कोविड 19” असे अधिकृत नाव दिले असून को म्हणजे करोना, व्ही म्हणजे व्हायरस आणि डी म्हणजे आजार असा त्याचा अर्थ आहे. चीनमध्ये एक हजारहुन अधिक रुग्ण या विषाणूमुळे दगावले असून ४२ हजार पेक्ष्या जास्त लोकांना याची लागण झाली असल्याचे सांगितले जाते. पंचवीस देशामध्ये हा आजार पसरला असून या आजारावर उपचार शोधण्यासाठी शात्रज्ञांकडून प्रयत्न सुरु आहे.

या विषाणूची निर्मिती वटवाघळाच्या माध्यमातून झाली असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. साप व अन्य प्राण्यांमार्फत हा आजार माणसांपर्यंत पसरल्याचे सांगण्यात येत आहे. चीन, ऑस्ट्रेलिया, फ्रान्स, जर्मनी, अमेरिका या देशामध्ये या विषाणूसाठी लस निर्माण करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. करोना विषाणू हा जागतिक धोका आहे, असे, जागतिक आरोग्य संघटनेने म्हंटले आहे.

HB_POST_END_FTR-A2

Advertisement

Advertisement

You might also like