Pimpri: शहरातील अनधिकृत किओक्स, फलक सरदार रविंद्रसिंग विनामोबदला काढणार

प्रायोगित तत्वावर सहा महिने काम देण्यास स्थायी समितीची मान्यता

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील विनापरवाना किओक्स, फलक, बोर्ड, जाहिरात फलक, जाहिरातीचे स्ट्रक्टर काढण्याचे काम सरदार रविंद्रसिंग विनामोबदला करणार आहेत. त्यासाठीचा खर्च ते स्वत: करणार असून मनुष्यबळ, वाहन, इतर यंत्रणा त्यांचीच असणार आहे. त्यामोबदल्यात ते जाहिरात उभारण्यासाठी वापरलेले साहित्य बांबु, वासे, चौकशी, किऔक्स, फलक, बोर्ड, जाहिरात फलक घेणार आहेत. त्यांच्याकडून प्रायोगिक तत्वार सहा काम करुन घेण्यास स्थायी समितीच्या बैठकीत आयत्यावेळी मान्यता देण्यात आली.

सद्यस्थितीत शहरातील अनधिकृत फेलक्स, बॅनर्स, होर्डिंग्ज, कमानी काढण्याचे काम अतिक्रमण पथकातील कर्मचा-यांमार्फत करण्यात येते. जप्त केलेले साहित्य महापालिकेच्या नेहरुनगर येथील गोडाऊनमध्ये जमा करुन लिलाव केला जातो. तथापि, साहित्य प्लास्टिक, कापड, बांबु, लाकुड स्वरुपाचे असल्याने ते निरुपयोगी होते.

महापालिका परिसराचा वाढता विस्तार आणि झपाट्याने होत असलेले अनधिकृत बांधकामे, अतिक्रमणे लक्षात घेता अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या कामकाजात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. शहरातील विनापरवाना अतिक्रमण फेलक्स, बॅनर, बोर्डे कमानीबाबत तक्रार प्राप्त झाल्यास 72 तासात कारवाई करण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश आहेत.

महापालिका हद्दीतील विनापरवाना किओक्स, फेलक्स, बोर्ड, जाहिरात फलकांमुळे होणारे विद्रुपीकरणाबाबत विविध राजकीय पदाधिकारी, सांस्कृतीक मंडळे, वाढदिवस शुभेच्छा, सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक श्रद्धांजलीसह इतर कार्यक्रमांचे फेलक्स विनापरवाना लावण्यात आल्यामुळे विद्रुपीकरण होते. शहराला विद्रुपीकरणातून मुक्त करण्याबाबत एक विशेष उपक्रम चालविण्याचे कार्य विनामूल्य करण्याचे पत्र सरदार रविंद्र सिंग यांनी 25 नोव्हेंबर 2019 रोजी महापालिकेला दिले होते.

त्यांनी महापालिका हद्दीतील विनापरवाना किओक्स, फलक, बोर्ड, जाहिरात फलक, जाहिरातीचे स्ट्रक्टर काढण्याचे काम स्वत:च्या खर्चाने करण्याची तयारी दर्शविली होती. त्यासाठी लागणारे मनुष्यबळ, वाहन, इतर यंत्रणा त्यांचीच असणार आहे. त्यामोबदल्यात ते जाहिरात उभारण्यासाठी वापरलेले साहित्य बांबु, वासे, चौकशी, किऔक्स, फलक, बोर्ड, जाहिरात स्वत: घेणार आहेत. त्यांच्याकडून प्रायोगिक तत्वार सहा काम करुन घेण्यास स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.