Pimpri : कै. तुकाराम तनपुरे फाउंडेशन तर्फे वारकऱ्यांसाठी मोफत आरोग्य शिबिर

एमपीसी न्यूज –  जगद्गुरु श्री. संत तुकाराम महाराज (Pimpri) पालखी सोहळ्या निमीत्त रविवारी (दि.11) पिंपरी-चिंचवड येथे वारकऱ्यांसाठी मोफत आरोग्य शिबिर घेण्यात आले.या शिबिराचे आयोजन कै. तुकाराम तनपुरे फाउंडेशन (KTTF) तर्फे करण्यात आले होते.

या शिबिराचे उद्दघाटन  कामगार नेते काशिनाथ नखाते साहेब यांच्या हस्ते झाले. दरवर्षीप्रमाणे  वारकऱ्यांसाठी वैद्यकीय आरोग्य तपासणी शिबिर, औषधे वाटप, मालिश/मसाज, तसेच त्यांना आवश्यक इतर बाबी अश्या प्रकारची मोफत सेवा देण्यात आली. यावर्षीचे विशेष म्हणजे तुकाराम तनपुरे फाउंडेशन तर्फे, संजीवनी रक्तपेढीमार्फत रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. यात प्रामुख्याने तनपुरे फाउंडेशनच्या अनेक KTTF पोलीस मित्रांनी रक्तदान केले.

निगडी पोलीस स्टेशन अंतर्गत, दरवर्षीप्रमाणे KTTF पोलीस मित्र यांनी, पालखी बंदोबस्त केला. पालखीचे आगमन झाल्यावर स्वागत इंट्री कक्ष ते पालखी मार्गावर भक्ती शक्ती चौक, हनुमान मंदिर, टिळक चौक, महाराष्ट्र बँक, दत्तवाडी चौक या ठिकाणी KTTF पोलीस मित्रांनी बंदोबस्त केला. काही पोलीस मित्र पालखी आकुर्डी येथे पोहचल्यावर, भक्ती शक्ती चौक ते टिळक चौकापर्यंत स्वच्छता करण्यासाठी सहभागी झाले.

Bhosari : विद्यार्थी वारकऱ्यांनी दिला महापुरुषांचा वैचारिक वारसा जपण्याचा संदेश

वैद्यकीय आरोग्य शिबिरासाठी प्रामुख्याने धनश्री हॉस्पिटल, वेदांत हॉस्पिटल, निदान क्लिनिक, धन्वंतरी क्लिनिक, अनुभूती आयुर्वेद चिकित्सालय, विश्व भारत आयुर्वेद चिकित्सालय, विश्वहरी आयुर्वेद क्लिनिक, अश्वथा आयुर्वेद, व संजीवनी क्लिनिक आणि माऊली आयुर्वेद इ. हॉस्पिटल्स यांच्या वतीने वैद्यकीय सेवेसाठी डॉक्टर उपलब्ध करून देण्यात आले.

आरोग्य शिबिर आयोजना साठी लागणारे साहित्य मेडिसिन्स, औषधे ,जेवण, नाश्ता, चहा इत्यादी वस्तू रुपी मदत काही मेडिकल्स, हॉटेल्स, पानसे ऑटोकॉप्स, बॅनर ग्राफिक प्रिंटर्स, शहरातील दानशूर व्यक्ती व काही पोलीस मित्र या सर्वांच्या वस्तुरूपी योगदानातून कार्यक्रम यशस्वी झाला. यात प्रामुख्याने वासुदेव काळसेकर, नितीन मोरे, केटरर्स धुमंसरे, मोशी विभाग प्रमुख स्मिताताई सस्ते, सागर दादा सुपल, ओम घोने, शीला कालेकर प्रथमेश आंबेरकर, कांतीलाल हरिणखेडे, मुकेश चुडासामा, देवजी सापरिया अशा अनेकांनी वस्तू रुपी मदत देऊन आपले योगदान केले.

पोलीस मित्रांना सामाजिक बांधिलकीतून सेवा कार्यासाठी प्रेरणा देणारे, संस्थेचे आधारस्तंभ वासुदेव कळसेकर व नितीन मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा सेवा कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला. तनपुरे फाउंडेशनच्या या सेवाभावी सेवाकार्याबद्दल उपस्थित सर्व पोलीस मित्रांच्या सहकार्यासाठी फाउंडेशनचे अध्यक्ष अशोक तनपुरे यांनी (Pimpri)  सर्वांचे कौतुक केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.