Pimpri: क्रांतिवीर चापेकर विद्यामंदिरात जागतिक महिला दिन साजरा

एमपीसी न्यूज – झिंग झिंग झिंगाट फेम युवा कीर्तनकार आणि व्याख्याती ऋतिका कदम यांनी आई वडिलांची सेवा हीच ईश्वर सेवा हे आपल्या अनेक गोष्टी, गीतांमधून सादर करून सर्व उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. निमित्त होते चिंचवड येथील क्रांतिवीर चापेकर विद्यामंदिर येथे आयोजित केलेल्या महिला दिनाच्या कार्यक्रमाचे.

  • या कार्यक्रमास शाळा समितीचे अध्यक्ष गतिराम भोईर, क्रांतीवीर चापेकर स्मारक समितीचे सदस्य आसाराम कसबे, मुख्याध्यापिका वासंती तिकोने आदी उपस्थित होते.

    या कार्यक्रमात बजाज एज्युकेशनतर्फे माधुरी शाळीग्राम यांनी विद्यार्थी, पालकांना समुपदेशन करत विद्यार्थ्यांनी पालकांसोबतचे नाते कसे दृढ करावे याबाबत मार्गदर्शन केले. त्यानंतर झिंग झिंग झिंगाट फेम युवा कीर्तनकार आणि व्याख्याती ऋतिका कदम यांनी आई वडिलांची सेवा हीच ईश्वर सेवा हे आपल्या अनेक गोष्टी, गीतांमधून सादर करून सर्व उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. वैशाली ऐतराज यांनी देखील विद्यार्थी पालकांना मार्गदर्शन केले.

या निमित्ताने विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या आर्ट अॅन्ड क्राफ्टच्या वस्तू तसेच शिवणकाम व गृहविज्ञानांतर्गत विविध चटण्या, नाष्टा पदार्थ, सरबते, ठसेकाम, संग्रहवह्या, स्वरचित काव्यसंग्रह, बालवर्गातील विद्यार्थ्यांनी केलेल्या वस्तू यांचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. या प्रदर्शनाचे पालक व मान्यवरांनी कौतुक केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी माधुरी कुलकर्णी, स्मिता जोशी, वीणा तांबे, प्रमोदिनी बकरे, सुनीता चौधरी, गणेश शिंदे यांचे सहकार्य मिळाले.

  • प्रास्ताविक मीना जाधव, सूत्रसंचालन स्नेहा पाठक यांनी केले तर, आभार सरला पाटील यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.