Pimpri : उद्धव ठाकरे यांच्याकडून युवराज दाखले यांचे कौतुक

एमपीसी न्यूज – खासदार निलेश राणे यांनी शिवसेनाप्रमुखांच्या व शिवसैनिकांविरोधात केलेल्या बेताल वक्तव्याचा निषेध करीत राणे यांच्या विरोधात शिवशाही व्यापारीसंघ प्रदेशाध्यक्ष युवराज दाखले यांनी वाकड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला होता. त्यांनी दाखवलेल्या धाडसाचे कौतुक करीत शिवसेनाप्रमुख उध्दव ठाकरे यांनी युवराज दाखले यांच्या पाठीवर थाप दिली आहे.

मुंबईत मातोश्री येथे दाखले यांच्यासह सर्व शिवसैनिकांची उध्दव ठाकरे यांनी भेट घेऊन पुढेही असेच धाडसी कार्य करत राहण्याच्या शुभेच्छा दिल्या.

यावेळी शिवसेना सचिव खासदार आनिल देसाई यांनी युवराज दाखले यांचा पुष्पगुच्छ देऊन मातोश्रीवर सत्कार केला. याप्रसंगी शिवसेना उपनेते नितीन बानगुडे पाटील, अमोल कोल्हे, खासदार श्रीकांत शिंदे, शिवशाही व्यापारीसंघ प्रदेश सचिव गणेश आहेर, गोरख पाटी, बाळासाहेब गायकवाड, मारूती मस्के, शिवसेना विभागप्रमुख प्रदिप दळवी, मनोज शिंदे, आशिष वाळके, रविकिरण घटकार, सौरभ शेंडगे, नवनाथ जाधव आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.