Pimpri : कलाकाराच्या नम्रतेलाच गुरुंचा आशीर्वाद मिळतो – नुपुर दैठणकर

एमपीसी न्यूज – कलाकार कोणीही असू शकते. मात्र, ज्याच्या अंगी कलेबरोबर नम्रता आहे. त्याच कलाकाराला गुरुंचा आशीर्वाद मिळतो, असे मत सुप्रसिद्ध भरतनाट्यम नृत्यांगना नुपुर दैठणकर यांनी शनिवारी (दि.२ फेेब्रुवारी) चिंचवड येथे व्यक्त केले.

चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात नृत्यकला मंदिर तर्फे ‘नृत्यांजली’ या कार्यक्रमात नुपुर दैठणकर या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. यावेळी नृत्यकला मंदिरच्या संस्थापक आणि गुरू तेजश्री अडिगे, नृत्यकला मंदिरचे विद्यार्थी आणि त्यांचे पालक आदी उपस्थित होते.

‘नृत्यांजली’ कार्यक्रमाचे यंदाचे २३ वे वर्ष आहे. नृत्यकला मंदिरमध्ये नृत्याचे वेगवगळे कोर्सेस घेतले जातात आणि नृत्याचा अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या नृत्यांगनांना या कार्यक्रमामध्ये नुपुर दैठणकर यांच्या हस्ते पदवी प्रदान करण्यात आली.

यामध्ये प्रथम वर्ष – प्रथम क्रमांक -श्रेया वाळसे, द्वितीय क्रमांक -कस्तुरी सुतार, मृण्मयी मेरुकर. तृतीय क्रमांक -अनुष्का बीसवास, लेहेर मित्तल.
द्वितीय वर्ष –प्रथम क्रमांक -पूर्बाशा फाल्गुनी. द्वितीय क्रमांक -मेधा जाधव, शर्वरी खत्री. तृतीय क्रमांक -वेदिका जाधव, महेश्वरी जोशी.
तृतीय वर्ष- प्रथम क्रमांक -प्रांजल गंगनमले. द्वितीय क्रमांक -अद्विका करजगी. तृतीय क्रमांक -अवनी लोंढे, आर्या शिंदे.
चतुर्थ वर्ष –वीणा भोसले (प्रथम), तन्वी एकदारी, अपूर्वा क्षीरसागर (द्वितीय क्रमांक), तृतीय – आदिती माळी, अभिलाषा साळुंके.
पाचवे वर्ष – प्रथम – श्रध्दा कोरे, द्वितीय – मैत्रेयी जोशी, ज्ञानेश्वरी साळुंके. तृतीय क्रमांक – सिंथीया पवार (प्रथम), वैष्णवी पाटील (द्वितीय).

  • अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थिनींमध्ये विदयुलता खत्री, आदिती रानवडे, इशिता राणे, सिध्दी कटारिया, शर्वरी कुदळे, रुचाली बोरोले, तन्वेशा शिंदे, संस्कृती फुलसुंदर, शांभवी यादव, महिका मोरे, सिया सोनी, सौम्या आचारी, संस्कृती येवलेकर, श्रावणी माने, मेहेक सागळे, प्राजक्ता मालपाणी, प्रज्ञा गोरे, श्रुती माळी, सहाय्यक – दिपाली देशपांडे, हर्षा औटी, संस्कृीत मगदुम, अंजली औटी, अमृता काकडे. प्राजक्ता चंद्रात्रे, गौरी घाडगे.

यावेळी नुपुर दैठणकर म्हणाल्या, कलाकाराच्या कलेत, वागण्यात नम्रता हवी. कारण त्यातूनच त्याला कला सादर करण्याचा आत्मविश्वास येत असतो. नृत्य सादर करताना कवीने जे मांडले आहे ते जसेच्या तसे आपल्या नृत्यातून आणि अभिनयातून सादर करायचे असते. यासाठी नृत्याचा नियमित रियाज करणे गरजेचे असते, असे उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

  • तर पालकांना बोलताना दैठणकर म्हणाल्या, नृत्य, संगीत, गायन या कलेतून आपल्या पाल्यावर अनेक संस्कार होत असतात. त्यामुळे पालकांना त्यांना वेगळ्या संस्कार वर्गाला पाठविण्याची गरज नसते, असेही दैठणकर यांनी आवर्जून सांगितले.

यावेळी नृत्यकला मंदिरच्या १२० विद्यार्थ्यांनी विविध शास्त्रीय नृत्याचे प्रकार सादर केले. यामध्ये श्लोक, अलारिपू, पुष्पांजली, गीतम, सरस्वती कौतुकम, जतीस्वरम, ,वर्णनम् , तिल्लाना, मंगलम आदी नृत्य सादर करण्यात आले. यावेळी तिसरी ते दहावी या वर्गातील विद्यार्थींनींनी त्यांची कला सादर केली. अंजना नायर यांनी कृष्णावर आधारीत नृत्य केले.

  • या नृत्यास गायनाची साथ प्रणाली जांभळे (गायिका), मृदुंग – (एच. व्यंकटरमन), व्हायोलिन – संजय उपाध्याय, नटुवांगम (पढन) तेजश्री अडिगे यांनी दिली. ‘नृत्यांजली’च्या या कार्यक्रमासाठी गुरू तेजश्री अडिगे यांनी नृत्यासाठी मार्गदर्शन केले. तर सूत्रसंचालन श्रद्धा मंडलेचा आणि शोभा कुलकर्णी यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.