Pimpri : जिल्हास्तरीय मुद्रा बॅकेच्या समितीवर अशासकीय सदस्यपदी प्रा. संजीवनी पांडे यांची निवड

एमपीसी न्यूज – जिल्हास्तरीय मुद्रा बॅंक समन्वय समितीवर अशासकीय सदस्य म्हणून प्रा. संजीवनी पांडे यांची निवड करण्यात आली आहे. त्यांना महाराष्ट्र शासनाच्या अवर सचिव प्रियंका छापवाले यांनी निवडीचे पत्र दिले आहे.

या निवडीबाबत बोलताना प्रा. संजीवनी पांडे म्हणाल्या की, सरकार तर्फे अनेक सरकारी योजना नागरिकांच्या हितासाठी उतरवल्या जातात. पण अनेक नागरिकांपर्यंत या योजनांची माहिती पोहचत नाही. त्यामुळे त्यांना या योजनांचा लाभ मिळत नाही. मुद्रा बॅंक कर्ज योजनेबाबतही अशीच स्थिती सर्वेक्षणात दिसून आली. हे चित्र बदलण्यासाठी तसेच योजनांचा प्रचार प्रसार करुन योजना लोकांना माहिती व्हावी, यासाठी जिल्हास्तरावर मुद्रा बॅंक योजना समन्वय समिती गठित करण्याचे आदेश नियोजन विभागाने दिले. ही योजना शिशु,किशोर,तरुण अशा तीन स्तरांवर विभागली गेली आहे . तरी हया योजनेचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांनी घ्यावा असे आवाहन प्रा. पांडे यानी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.